तिरुअनंतपूरम**, 28** सप्टेंबर**:** भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातल्या नागपूर टी20दरम्यान ओल्या आऊटफिल्डमुळे अवघ्या 8-8 ओव्हर्सचा खेळ झाला होता. नागपूरमध्ये सामन्याआधी झालेल्या पावसामुळे आऊटफिल्ड ओली राहिली. त्यामुळे सामना नियोजित वेळेच्या तब्बल अडीच तास उशीरानं सुरु झाला. त्या सामन्याची आठवण होण्याचं कारण म्हणजे आज भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधली टी20 सामन्यांची मालिका सुरु होत आहे. आणि या मालिकेतल्या तिरुअनंतरपूरमच्या पहिल्या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिरुअनंतपूरम टी20 वर पावसाचे ढग भारत-दक्षिण आफ्रिका संघातला हा पहिला टी20 सामना संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. त्याआधी 6.30 वाजता नाणेफेक होईल. पण इथलं वातावरण सध्या ढगाळ आहे आणि सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एक्युवेदर या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेनं आज तिरुअनंतपूरममध्ये पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज तिरुअनंतपूरममधलं कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश इतकं राहिल. वातावरण ढगाळ राहिल तर संध्याकाळी सातनंतर पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामन्यादरम्यान व्यत्यय येण्याचा अंदाज आहे. हेही वाचा - ICC T20 Rankings: टीम इंडियाचा ‘सूर्य’ पुन्हा चमकला… टी20 रॅन्किंगमध्ये भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंचा बोलबाला भारत वि. दक्षिण आफ्रिका पहिली टी20, ग्रीन फिल्ड स्टेडियम, तिरुअननंतपूरम संध्याकाळी 7.00 वाजता स्टार स्पोर्टस, डिस्ने हॉटस्टारवर थेट प्रक्षेपण **भारतीय टी20 संघ –**रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेट किपर), दिनेश कार्तिक (विकेट किपर), रवीचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, शाहबाज अहमद दक्षिण आफ्रिकेचा टी20 संघ - तेम्बा बवुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रिझा हँड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉकिया, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, रिले रुसो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, ब्यॉर्न फॉर्च्यून, मार्को यान्सन आणि एंडिल फेहलुकवायो
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.