माऊंट माँगानुई, 19 नोव्हेंबर: भारत आणि न्यूझीलंड संघातल्या पहिल्या टी20 सामन्यात पावसामुळे पूर्ण खेळ वाया गेला. एकाही बॉलचा खेळ न होता वेलिंग्टनमधला हा सामना रद्द करण्यात आला. आता दुसऱ्या टी20 सामन्यासाठी दोन्ही टीम्स माऊंट माँगानुईत दाखल झाल्या आहेत. हार्दिक पंड्याची टीम इंडिया आणि केन विल्यमसनच्या किवी संघात इथे रविवारी दुसरा टी20 सामना होणार आहे. पण चाहत्यांसाठी या सामन्याआधीही एक निराशेची बातमी आहे. कारण माऊंट माँगानुईतल्या दुसऱ्या सामन्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Weather Report नुसार...
न्यूझीलंडच्या माऊंट माँगानुई भागात बे ओव्हल हे मैदान आहे. याठिकाणी भारत आणि न्यूझीलंड संघातला दुसरा टी20 सामना होत आहे. पण स्थानिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार इथे रविवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता 64 टक्के इतकी आहे. मॅचच्या सुरुवातीला पावसाच्या हलक्या सरी अपेक्षित आहेत. तर पहिल्या इनिंगनंतर मोठा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
📸 📸 Snapshots from #TeamIndia's traditional welcome at Mt. Maunganui Image Courtesy: Jamie Troughton/Dscribe Media#NZvIND pic.twitter.com/K4yUiScPO7
— BCCI (@BCCI) November 19, 2022
युवा खेळाडूंना संधी, पण...
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात बीसीसीआयनं वर्ल्ड कपनंतर एक युवा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर पाठवला आहे. पण या खेळाडूंना पहिल्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. तर दुसऱ्या सामन्यातही पावसाची शक्यता असल्यानं 20-20 ओव्हर्सचा खेळ होण्याची शक्यता कमी आहे.
हेही वाचा - MS Dhoni: धोनीच्या घरी 'नवी पाहुणी'... शुभेच्छा देण्यासाठी केदार जाधव, ऋतुराज पोहोचले रांचीत; Video
भारत वि. न्यूझीलंड
दुसरा टी20 सामना, बे ओव्हल, माऊंट माँगानुई
20 नोव्हेंबर, भारतीय वेळेनुसार दु. 12 वाजल्यापासून
अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर थेट प्रक्षेपण
भारताचा टी20 संघ - हार्दिक पंड्या (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), ईशान किशन, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sports, T20 cricket, Team india, Weather update