Home /News /sport /

Rahul Dravid on Virat Kohli: 'विराटकडून मला शतक नको', निर्णायक टेस्टपूर्वी द्रविडनं केलं जाहीर!

Rahul Dravid on Virat Kohli: 'विराटकडून मला शतक नको', निर्णायक टेस्टपूर्वी द्रविडनं केलं जाहीर!

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्टार फलंदाज विराट कोहलीचे कौतुक केलं आहे. विराट हा ड्रेसिंग रूममधील इतर अनेक खेळाडूंना नेहमी प्रेरित करतो. इतकी समर्पित आणि मेहनती व्यक्ती मी कधीच पाहिली नाही.

    नवी दिल्ली, 30 जून : अडीच वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी विराट कोहलीच्या बॅटने अद्याप शतक झळकावलेले नाही. या काळात कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय, टी-20) शतक झळकावता आलेले नाही. यावरून विराट कोहलीवर नेहमीच टीका होत असते. काही दिग्गजांनी कोहलीचे समर्थन केले, तर काहींनी टीका केली. पण, टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोहलीकडून वेगळ्याच अपेक्षा आहेत. टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देताना द्रविडने विराटचे समर्थन केलंय. मला त्याच्याकडून शतक नको आहे, संघासाठी सामना जिंकवून देणारी खेळी करणे महत्त्वाचे आहे. कोहलीपेक्षा मेहनती माणूस मी पाहिला नाही - टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्टार फलंदाज विराट कोहलीचे कौतुक केलं आहे. विराट हा ड्रेसिंग रूममधील इतर अनेक खेळाडूंना नेहमी प्रेरित करतो. इतकी समर्पित आणि मेहनती व्यक्ती मी कधीच पाहिली नाही, असेही द्रविड म्हणाला. शतकी कामगिरीपेक्षा सामना जिंकवून देणाऱ्याचे योगदान हे खरोखर महत्त्वाचे आहे, असे द्रविड म्हणाला. शतक महत्त्वाचे नाही - प्रशिक्षक द्रविड म्हणाले, 'प्रत्येक खेळाडू कारकिर्दीत अशा टप्प्यांतून जातो. विराट कोहलीही यातून जात आहे. शतकावर लक्ष केंद्रित करण्याची ही वेळ नाही. लोक शतकाला यश म्हणून पाहतात, पण आम्हाला विजयाची गरज आहे. विराट कोहली जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये असतो तेव्हा तो अनेकांना प्रेरणा देतो. हे वाचा - विराटला प्रपोज केलेल्या क्रिकेटरसोबत लंच डेटवर अर्जुन तेंडुलकर; सुरूय लंडनची सैर कोहलीचं शेवटचं शतक कधी? विराट कोहली गेल्या अडीच वर्षांपासून मोठ्या धावसंख्येसाठी धडपडत आहे. नोव्हेंबर 2019 पासून, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय, T20) शतक झळकावू शकलेला नाही. कोहलीने नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध डे-नाईट कसोटीत शेवटचे शतक झळकावले होते. हा सामना कोलकातामध्ये झाला होता. हे वाचा -  इंग्लंडला पहिला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या इयन मॉर्गनचा राजीनामा कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (क), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा., मोहम्मद सिराज, उमेश यादव.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Virat kohali

    पुढील बातम्या