हरारे, 16 ऑगस्ट**:** लोकेश राहुलची टीम इंडिया सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. 18 ऑगस्टपासून भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे. पण या मालिकेतील पहिल्या सामन्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला दुखापतीमुळे संघाबाहेर जावं लागलंय. इंग्लंडमधल्या रॉयल लंडन कपमध्ये खेळताना वॉशिंग्टन सुंदरच्या खांद्याला दुखापत झाली होती. झिम्बाब्वे दौऱ्यात सुंदरला याच दुखापतीचा फटका बसला आहे. शाहबाज अहमद भारतीय संघात वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाल्यानं बीसीसीआयनं त्याच्याजागी अष्टपैलू शाहबाज अहमदला संघात घेतलं आहे. बंगालच्या शाहबाज अहमदनं प्रथम श्रेणी आणि लीस्ट ए क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी बजावली आहे. गेल्या आयपीएल मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडूनही 16 सामने खेळताना चांगलं प्रदर्शन केलं आहे.
UPDATE - Shahbaz Ahmed replaces injured Washington Sundar for Zimbabwe series.
— BCCI (@BCCI) August 16, 2022
More details here - https://t.co/Iw3yuLeBYy #ZIMvIND
हेही वाचा - Amitabh Chaudhary: झारखंडला भारतीय क्रिकेटच्या नकाशावर आणणारे माजी बीसीसीआय सचिव अमिताभ चौधरींचं निधन सुंदरची दुखापतींशी झुंज वॉशिंग्टन सुंदरच्या पाठिमागे दुखापतीचा ससेमिरा सुरुच आहे. गेल्या वर्षभरात दुखापतींच्या वेगवेगळ्या कारणांमुळे त्याला संघाबाहेर राहावं लागलं आहे. जुलै 2021 मध्ये काऊंटी क्रिकेट खेळताना सुंदरचं बोट फ्रॅक्चर झालं होतं. त्यानंतर कोरोनामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्याला त्याला मुकावं लागलं होतं. फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या विंडीजविरुद्धच्या सामन्यात मांडीच्या दुखापतीनं डोकं वर काढलं. याच दुखापतीमुळे त्याला श्रीलंकेविरुद्धची मालिकाही हुकली. आयपीएलमध्येही दुखापतीनं सुंदरची पाठ सोडली नाही. हैदराबादकडून खेळणारा सुंदर आयपीएलच्या पाच सामन्यात दुखापतीमुळे संघाबाहेर होता. सुंदरनं आतापर्यंत टीम इंडियाकडून 4 कसोटी, 4 वन डे आणि 31 कसोटी सामने खेळले आहेत.

)







