रांची**, 16** ऑगस्ट**:** भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी सचिव आणि माजी आयपीएस अधिकारी अमिताभ चौधरींचं आज सकाळी निधन झालं. ते 62 वर्षांचे होते. हृदयविकाराचा धक्का बसल्यानं त्यांना आज सकाळी रांचीतल्या सेंटेव्हिटा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर त्यांची तब्येत बिघडली होती. पण आज सकाळी अशोक नगरमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. अशी माहिती चौधरी यांचे निकटवर्तीय आणि झारखंड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव देवाशिष चक्रवर्तींनी यांनी दिली. झारखंड क्रिकेटसाठी मोठं योगदान 2004 साली टीम इंडियात महेंद्रसिंग धोनी नावाचा एक युवा शिलेदार सामील झाला. त्यानंतर त्यानं भारतीय क्रिकेटमध्ये जे काही योगदान दिलं ते सर्वश्रुत आहे. पण झारखंडसारख्या छोट्याशा राज्याला क्रिकटच्या नकाशावर आणण्याचं काम केलं ते अमिताभ चौधरी यांनी. अमिताभ चौधरी हे झारखंड क्रिकेट असोसिएशनचे दीर्घकाळ अध्यक्ष होते. त्यांच्याच प्रयत्नांमुळे रांचीसारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्टेडियम उभं राहिलं. 2002 साली चौधरी बीसीसीआयचे सदस्य बनले. तर 2005 साली झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. अमिताभ चौधरींनी टीम इंडियाचे मॅनेजर म्हणूनही काम पाहिलं होतं. मुख्यमंत्र्यांकडून दु**:**ख व्यक्त अमिताभ यांच्या निधनानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. “माजी आयपीएस अधिकारी अमिताभ चौधरी यांनी राज्यात क्रिकेट खेळाला गती देण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं. त्यांच्या आत्माला शांती मिळू दे आणि त्यांच्या कुटुंबाला या दु:खातून सावरण्याची ताकद मिळू दे.’’ असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
#JPSC के पूर्व अध्यक्ष श्री अमिताभ चौधरी जी के आकस्मिक निधन की दुःखद खबर मिली।
— Hemant Soren (@HemantSorenJMM) August 16, 2022
पूर्व IPS अधिकारी अमिताभ जी ने राज्य में क्रिकेट के खेल को बढ़ाने में भी महत्वपूर्ण भूमिका निभाई थी।
परमात्मा दिवंगत आत्मा को शांति प्रदान कर शोक संतप्त परिवार को दुःख की घड़ी सहन करने की शक्ति दे।
हेही वाचा - Asia Cup: आशिया चषकातील टॉप 5 खेळाडू, जे आहेत ‘मॅन ऑफ द सीरीज’चे प्रबळ दावेदार आयपीएस अधिकारी अमिताभ चौधरी चौधरींचा जन्म 6 जुलै 1960 चा. 1984 साली आयआयटी खडगपूरमधून पदवी घेतल्यानंतर ते 1985 साली आयपीएस अधिकारी बनले. 1997 साली ते रांचीचे एसएसपी बनले. 29 ऑक्टोबर 2020 साली त्यांची झारखंड लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 5 जुलै 2022 पर्यंत ते या पदावर कार्यरत होते.