जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Pro Kabaddi League : यू मुंबाने बैंगलुरू बूल्सला लोळवलं, सिझनची धडाक्यात सुरूवात

Pro Kabaddi League : यू मुंबाने बैंगलुरू बूल्सला लोळवलं, सिझनची धडाक्यात सुरूवात

Pro Kabaddi League : यू मुंबाने बैंगलुरू बूल्सला लोळवलं, सिझनची धडाक्यात सुरूवात

प्रो कबड्डी लीगमधील (Pro Kabaddi League) पहिल्या मॅचची सुरुवात आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा झाली नाही. यंदा स्पर्धेतील सर्व सामने हे बंगळुरूमध्ये होणार आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 डिसेंबर :  प्रो कबड्डी लीगमधील (Pro Kabaddi League) पहिल्या मॅचची सुरुवात आहे. Bengaluru Bulls आणि U Mumba मध्ये पहिला सामना रंगला आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा झाली नाही. यंदा स्पर्धेतील सर्व सामने हे बंगळुरूमध्ये होणार आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच फॅन्सच्या अनुपस्थितीमध्ये हे सामने होणार आहेत. आजवर 5 टीमनं ही स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेसाठी टीम, खेळाडू आणि मॅच बाबत खास नियम तयार करण्यात आले आहेत. प्रो कबड्डील लीगची मजा अनुभवण्यासाठी हे नियम समजून घेणे आवश्यक आहे. मॅचचा कालावधी किती? एका मॅचचा कालावधी 40 मिनिटांचा असतो. 20-20 मिनिटांच्या दोन हाफमध्ये मॅचची विभागणी होते. हाफ टाईममध्ये 5 मिनिटांचा ब्रेक दिला जातो. या ब्रेकनंतर दोन्ही टीमची साईड बदलते. स्कोअरिंग पद्धत काय आहे? विरोधी टीमचा प्रत्येक खेळाडू आऊट केल्यानंतर एक पॉईंट मिळतो. ऑल आऊट केल्यानंतर 2 बोनस पॉईंटची कमाई होते.  3 किंवा कमी खेळाडू असताना रेडरला आऊट केल्यास  डिफेंडिंग टीमला बोनस पॉईंट दिला जातो. हे ही वाचा- आजपासून Pro Kabaddi चा थरार, वाचा स्पर्धेतील सर्व महत्त्वाचे नियम टाईम आऊट कधी? मॅचच्या दरम्यान दोन्ही टीम 90 सेकंदाचा टाईम आऊट घेऊ शकतात. टाईम आऊट हा कोच, कॅप्टन किंवा कोणताही खेळाडू रेफ्रीच्या परवानगीने घेऊ शकतो. त्यावेळी मॅच थांबवली जाते. त्यानंततर पुन्हा जिथं मॅच थांबली आहे त्याच ठिकाणी ती पुन्हा सुरू होते. एखादा खेळाडू जखमी झाला तर मॅच रेफ्री किंवा ऑफिशियल टाईम आऊट घेतात. हा टाईम आऊट दोन्ही टीमच्या टाईम आऊटपेक्षा वेगळा असतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात