जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / KKRने एका खेळाडूसाठी जितके पैसे मोजले तेवढ्यात मुंबई इंडियन्सने घेतले 6 जण

KKRने एका खेळाडूसाठी जितके पैसे मोजले तेवढ्यात मुंबई इंडियन्सने घेतले 6 जण

आयपीएलच्या तेराव्या हंगामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण पहिलाच सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.

आयपीएलच्या तेराव्या हंगामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण पहिलाच सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया गुरुवारी कोलकात्यात पार पडली. मुंबई इंडियन्सने यामध्ये 6 खेळाडूंना खरेदी केलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 डिसेंबर : इंडियन प्रिमियर लीगच्या तेराव्या हंगामासाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया गुरुवारी पार पडली. यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर मोठी बोली लागली. संघांमध्येही या खेळाडूंना घेण्यासाठी चुरस बघायला मिळाली. पॅट कमिन्सला सर्वाधिक 15.5 कोटी रुपये देऊन कोलकाता नाइट रायडर्सने खरेदी केलं. या खेळाडूला मोजलेल्या पैशांपेक्षा कमी किंमतीत मुंबई इंडियन्सने 6 जण संघात घेतले. कोलकाता नाइट रायडर्सने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला 15.5 कोटी रुपये मोजून संघात घेतलं. त्याच्याशिवाय इयॉन मॉर्गनला 5.25 कोटी, वरुन चक्रवर्ती 4 कोटी, टॉम बँटन 1 कोटी या खेळाडूंसाठी केकेआरने कोट्यवधींची किंमत मोजली. याशिवाय राहुल त्रिपाठी, ख्रिस ग्रीन, निखिल नाइक, प्रविण तांबे, एम सिद्धार्थ या खेळाडूंनाही कोलकात्याने लिलावात घेतलं. आतापर्यंत चार वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईने लिलाव प्रक्रियेत 6 खेळाडू खरेदी केले. या सर्वांसाठी मोजलेली किंमत ही कोलकात्याने एका खेळाडूसाठी दिलेल्या किंमतीपेक्षा 3 कोटींनी कमी आहे. मुंबईने नाथन कुल्टर नाइल याला 8 कोटी तर ख्रिस लीनला 2 कोटी रुपये मोजले. त्याच्याशिवाय सौरभ तिवारी 50 लाख, दिग्विजय देशमुख 20 लाख, प्रिन्स 20 लाख आणि मोहसिन खान 20 लाख या खेळाडूंना मुंबईने संघात घेतलं. मुंबईने लिलावात घेतलेल्या या खेळाडूंव्यतिरिक्त संघात असलेले इतर खेळाडू रोहित शर्मा, शेफर्न रुदरफोर्ड, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा, सूर्यकुमार यादव, मिचेल मॅक्लेनघन, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंह, ट्रेंट बोल्ट, कायरन पोलार्ड, क्विंटन डी-कॉक, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, अनुकूल रॉय, जयंत यादव, इशान किशन, आदित्य तरे CSKच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, धोनीकडून काढून घेणार कर्णधारपद? लिलावात पॅट कमिन्स हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज पॅट कमिन्सला यावर्षीची सर्वात जास्त बोली लावण्यात आली. कमिन्सला 15.50 कोटी रुपयांना विकत घेण्यात आले. तर पंजाब संघाने मॅक्सवेलला 10.75 कोटींना विकत घेतले. मॅक्सवेल या पूर्वीही किंग्स इलेवन पंजाबमध्ये होता. हेटमायरला 7.75 कोटींना विकत घेण्यात आले. याशिवाय युवा खेळाडूंनाही चांगल्या रकमेत खरेदी करण्यात आले. भारताचा अंडर-19 कर्णधार प्रियम गर्गला हैदराबाद संघानं 1.90 कोटींना विकत घेतले. तर, विजय हजारे करंडकमध्ये द्विशतकी खेळी करणाऱ्या यशस्वी जयस्वालवर राजस्थान संघानं 2.40 कोटींची बोली लावली. तर, प्रथम श्रेणी क्रिकेट गाजवणाऱ्या विराट सिंहवर हैदराबादने 1.90 कोटींची बोली लावली. IPL 2020: मोठी घोषणा, केएल राहुल करणार Kings XI Punjab चे नेतृत्त्व

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: IPL 2020
  • First Published :
जाहिरात
जाहिरात