जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL Auction 2020 : CSKच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, धोनीकडून काढून घेणार कर्णधारपद?

IPL Auction 2020 : CSKच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, धोनीकडून काढून घेणार कर्णधारपद?

IPL Auction 2020 : CSKच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, धोनीकडून काढून घेणार कर्णधारपद?

धोनीच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी, पुढच्या हंगामात कर्णधार बदलणार?

  • -MIN READ
  • Last Updated :

कोलकाता, 20 डिसेंबर : केवळ चाहतेच नव्हे तर सर्व संघाचे लक्ष आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या लिलावाकडे होते. IPL 2020मध्ये आठही संघ दर्जेदार खेळाडू लिलावात खरेदी केले. मात्र आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स असून त्याने चार वेळा हे विजेतेपद जिंकलेले आहे. तर, दुसर्‍या स्थानावर चेन्नई सुपरकिंग्ज आहे, ज्याने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात तीन वेळा ही विजेतेपद मिळवले आहे. मात्र या दोन्ही संघांनी लिलावात जास्त कमी पैसे असल्यामुळं जास्त खेळाडूंना खरेदी केले नाही. त्यामुळं सध्या असलेल्या संघासोबतच तेराव्या हंगामात हे दोन्ही संघ मैदानात उतरतील. मात्र या सगळ्यात धोनीच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. एकीकडे भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चेचा विषय वर्तविला जात असताना, दोन वर्ष आपण आयपीएल खेळत राहणार असल्याचे धोनीनं याआधीच स्पष्ट केले आहे. 2008मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आतापर्यंत महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे. मात्र आयपीएल 2020नंतर धोनीच्या भवितव्याबद्दल शंका निर्माण झाली आहे, पण आता त्याच्या जागी संघाची कमान स्वीकारणारा खेळाडू कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. 1.हरभजन सिंह : टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग चेन्नई सुपरकिंग्जकडून दोन वर्षे खेळत आहे. परंतु त्याआधी त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पहिले टी -20 विजेतेपद जिंकले. 2011मध्ये हरभजनच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करत चॅम्पियन्स टी -20लीगवर नाव कोरले. इतकेच नाही तर हरभजन सिंगही मुंबई इंडियन्सच्या 3 आयपीएल स्पर्धेतील विजेतेपद जिंकणार्‍या संघाचा एक भाग आहे. तथापि, गेल्या वर्षी मुंबईने अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून चौथे विजेतेपद जिंकले तेव्हा हरभजन विरोधी संघात होता. हरभजनने आयपीएलमध्ये 160 सामने खेळले आहेत. यात त्याने 150 बळी घेतले आहेत. त्याने एकदा चार विकेट आणि एकदा पाच विकेट्स घेतल्या आहेत. 2.सुरेश रैना: भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैना आयपीएलचा स्टार खेळाडू मानला जातो. आयपीएलमध्ये तो एका क्षणात चेन्नईच्या सामन्याचा दृष्टीकोन बदलत आहे. या स्पर्धेत त्याने 193 सामने खेळून 5 हजार 368 धावा केल्या आहेत. यावेळी, त्याची सरासरी 33.34 आहे आणि स्ट्राइक रेट 137.14 आहे. त्याने आयपीएलमध्ये 1 शतक आणि 38 अर्धशतके केली आहेत. एवढेच नाही तर रैनानं 28 वेळा नाबाद राहण्याची कमाल केली आहे. आयपीएलमध्ये त्यानं एकूण 493 चौकार आणि 194 षटकार ठोकले आहेत. रैनाने 101 कॅचही घेतले आहेत. 3.रवींद्र जडेजा: कर्णधार म्हणून धोनीच्या जागी रवींद्र जडेजा हा एक चांगला पर्याय आहे. या अनुभवी खेळाडूने आयपीएलमध्ये 170 सामने खेळले असून, त्यानं 1927 धावा केल्या आहेत. यात सरासरी 24.08 आणि स्ट्राइक रेट 122.58 आहे. जडेजाने 48 वेळा नाबाद खेळण्याची कामगिरी केली आहे. यात 135 चौकार आणि 65 षटकारांचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर त्याने गोलंदाजीतही महत्त्वपूर्ण कामगिरी केली असून 170 सामन्यांत त्याने 108 विकेट्स घेतल्या आहेत. जडेजाने आयपीएल 2019 मध्ये 15 गडी बाद केले आणि फलंदाजीमध्ये 106 धावा केल्या. असा आहे धोनीचा IPL रेकॉर्ड धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 190 सामने खेळले आहेत. पहिल्या हंगामापासून धोनी चेन्नई संघासोबत खेळत आहे. त्यानं आयपीएलमध्ये 42.20च्या सरासरीने 4 हजार 432 धावा केल्या असून 65 वेळा नाबाद खेळी केली आहे. विकेटकीपर म्हणून त्याने 98 कॅच आणि 38 स्टंप केले आहेत. धोनीच्या नावावर आयपीएलमध्ये 297 चौकार 209 षटकारांची नोंद आहे. कर्णधार म्हणून धोनीने 174पैकी 104 सामन्यात विजय मिळवला आहे. मात्र धोनीनं निवृत्ती घेतल्यास या तीन खेळाडूंपैकी एकाच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात