जेटलींनी आजारी असताना कलम 370 च्या ऐतिहासिक निर्णयावर लिहला होता शेवटचा ब्लॉग

अरुण जेटलींनी 6 ऑगस्टला लिहलेल्या शेवटच्या ब्लॉगमध्ये काश्मीर प्रश्नाच्या इतिहासापासून आतापर्यंतच्या घटनांचा आढावा घेतला होता.

News18 Lokmat | Updated On: Aug 24, 2019 01:57 PM IST

जेटलींनी आजारी असताना कलम 370 च्या ऐतिहासिक निर्णयावर लिहला होता शेवटचा ब्लॉग

मुंबई, 24 ऑगस्ट : भारताचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे नेते अरुण जेटली यांनी एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना तीन आठवड्यांपूर्वी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अरुण जेटली हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होते. याशिवाय निष्णात वकील असलेल्या जेटलींनी ब्लॉगदेखील लिहला आहे. त्यांनी 6 ऑगस्टला शेवटचा ब्लॉग लिहला होता.

अरुण जेटलींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये काश्मीरमधील कलम 370 च्या निर्णयाचं स्वागत करताना त्यांनी या प्रश्नावर इतिहासापासून आतापर्यंत घडलेल्या घडामोडींचा आढावा घेतला. त्यात म्हटलं होतं की, काश्मीरबाबत पंडित नेहरुंनी परिस्थिती समजून घेण्यात चूक केली. त्यांनी शेख मोहम्मद अब्दुल्ला यांच्यावर विश्वास ठेवून राज्याची जबाबदारी सोपवली. मात्र, 1953 मध्ये त्यांच्या अब्दुल्ला यांच्यावरचा विश्वास कमी झाला आणि अब्दुल्ला यांना तुरुंगात टाकले. नेहरुंच्या नंतर इंदिरा गांधीनी शेख अब्दुल्ला यांची सुटका केली आणि काँग्रेसला बाहेरुन पाठिंबा देत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला.

काही महिन्यांनी शेख अब्दुल्लांनी त्यांचे रंग दाखवायला सुरुवात केली. त्यामुळं राजीव गांधींनी 1987 मध्ये पुन्हा एकदा रणनिती बदलली आणि फारूख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्ससोबत निवडणूक लढवली. या निवडणुकीत गोंधळ झाला. काही उमेदवारांना पराभूत करण्यात आलं ते नंतर फुटीरतावादी झाले. यातील काहींनी तर थेट दहशतवादाची वाट निवडली.

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या ऐतिहासिक चुकीची किंमत देशाला चुकवावी लागली. आज जेव्हा इतिहासा नव्याने लिहला जात आहे तेव्हा डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांची त्यावेळी त्यांचा दृष्टीकोन योग्य होता आणि पंडीत नेहरु अपयशी ठरल्याचं सिद्ध झालं आहे.

Loading...

सरकारने काश्मीरबाबत घेतलेल्या निर्णयाला सर्वसामान्य जनतेनं पाठिंबा दिला आहे. लोकांचा पाठिंबा पाहून विरोधी पक्षांनीसुद्धा निर्णयाला फारसा विरोध केला नाही. इतकंच नाही तर राज्यसभेत काश्मीरवर प्रस्तावाला दोन तृतियांश अशी मंजूरी मिळाली. या निर्णयाच्या परिणामासह जम्मू काश्मीरच्या मुद्द्याला सोडवण्यासाठी करण्यात आलेल्या इतिहासातील अयशस्वी प्रयत्नांचं विश्लेषण केलं.

काँग्रेसने ही समस्या निर्माण केली आणि वाढवली. आता याचा काँग्रेसला पश्चाताप होत असेल. काँग्रेसचेच काही नेते या विधेयकाचं समर्थन करत आहेत. नवा भारत बदललेला भारत आहे. फक्त काँग्रेसला याची जाणीव नाही. काँग्रेसची अधोगतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

Arun Jaitley : निष्णात वकील, उत्कृष्ट संसदपटू आणि प्रभावी अर्थमंत्री

1989-90 मध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली होती. फुटीरतावाद्यांसोबत दहशतवादांनी हातपाय पसरायला सुरुवात केली होती. काश्मीरी पंडितांवर अत्याचार होत होते. त्यांना ते सहन करावे लागले. असा अत्याचार फक्त नाझींकडून झाला होता. काश्मीरी पंडितांना खोऱ्यातून बाहेर हाकलण्यात आलं होतं.

ज्यावेळी फुटीरतावाद वाढत होता तेव्हा वेगवेगळ्या पक्षांनी चालवलेल्या केंद्र सरकारने तीनवेळा प्रयत्न केला. त्यांनी फुटीरतावद्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला जो व्यर्थ गेला. द्विपक्षीय प्रकरणात पाकसोबत चर्चेचा प्रयत्न झाला. त्यानंतर केंद्रातील अनेक सरकारांनी देशहितासाठी मोठ्या पक्षांसोबत निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. दोन राष्ट्रीय पक्षांनी तिथल्या दोन्ही प्रादेशिक पक्षांवर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांना सत्तेत बसवलं पण तो प्रयत्नसुद्धा अपयशी ठरला.

-अरुण जेटली

VIDEO: भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं AIIMS रुग्णालयात निधन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2019 01:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...