ब्रिस्बेन, 19 ऑक्टोबर: पाकिस्तानी अँकर झेनाब अब्बास हे नाव गेल्या काही वर्षांसून चांगलच चर्चेत आहे. याच स्पोर्ट्स अँकरचं अनेक वर्षांपासूनचं एक स्वप्न पूर्ण झालं आहे. झेनाब अब्बासला टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीचा इंटरव्ह्यू घेण्याची संधी मिळाली. सोशल मीडियात झेनाबनं विराटसोबतचा फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे. पण याच पोस्टनंतर विराटच्या फॅन्सनी अजब कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. ‘आता विराट कोहलीचा बॅडलक सुरु झाला आहे.’ अशा प्रकारच्या कमेंट्स फॅन्सनी केल्या आहेत. झेनाबची पोस्ट आणि विराट ट्रोल झेनाबनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, ‘नेहमीच तुम्हाला कोहलीसोबत बोलण्याची संधी नाही मिळत, पूर्ण इंटरव्ह्यू लवकरच आयसीसीच्या चॅनेलवर दाखवला जाईल.’ एकीकडे विराटचा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर झेनाबच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. पण दुसरीकडे विराटच्या चाहत्यांना मात्र हे पसंतीस पडलेलं नाही. कारण झेनाब पाकिस्तानी आहे आणि त्यामुळे भारत-पाकिस्तान मॅचआधी हा अपशकुन असल्याचं चाहत्यांनी म्हटलंय. हेही वाचा - T20 World Cup: शाहीन आफ्रिदी फिट झाला पण सराव सामन्यात त्यानं ‘या’ खेळाडूचा पाय मोडला, पाहा Video 2017 साली झेनाबचा विराटसोबत सेल्फी 2017 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान झेनाबनं विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्ससोबत सेल्फी घेतला होता. पण याच सेल्फीनंतर विराट आणि डिव्हिलियर्स दोघेही पुढच्याच सामन्याच शून्यावर आऊट झाले होते. अशातच विराटच्या फॅन्सना पुन्हा वाटतंय की याचीच पुनरावृत्ती होऊ शकते.
Not every day that you get to speak to/interview @imVkohli, what a fantastic orator, watch out on the @ICC channels. pic.twitter.com/tBsJSF2Drm
— zainab abbas (@ZAbbasOfficial) October 18, 2022
आशिया कपपासून विराट फॉर्ममध्ये दरम्यान आशिया कपपासून विराटच्या बॅटमधून धावांचा ओघ पुन्हा सुरु झाला आहे. पण त्याआधी विराट खराब फॉर्ममधून जात होता. त्यासाठी विराटनं एक मोठा ब्रेक घेतला होता. इतकच नव्हे तर विराटनं बॅटही हातात घेतली नव्हती. पण त्यानंतर आशिया कपमध्ये विराटनं दमदार कामगिरी केली. तो फॉर्ममध्ये परतला. इतकच नव्हे तर अफगाणिस्तानविरुद्ध विराटनं शतकही ठोकलं आणि तीन वर्षांचा शतकांचा दुष्काळही संपवला. त्या सामन्यात विराटनं 122 धावांची खेळी केली होती. त्यामुळे आगामी टी20 वर्ल्ड कपमध्येही टीम इंडियाला विराटकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पण चाहत्यांना मात्र आता एक वेगळीच चिंता सतावतेय.