• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • विराट वनडे, टी-20 टीमचा कॅप्टन राहणार का नाही? BCCI ची पहिलीच प्रतिक्रिया

विराट वनडे, टी-20 टीमचा कॅप्टन राहणार का नाही? BCCI ची पहिलीच प्रतिक्रिया

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) वनडे आणि टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडेल, अशी बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यावर बीसीसीआयची (BCCI) पहिलीच प्रतिक्रिया आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 13 सप्टेंबर : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) वनडे आणि टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडेल, अशी बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यावर बीसीसीआयची (BCCI) पहिलीच प्रतिक्रिया आली आहे. बोर्डाचे कोषाध्यक्ष अरुण धूमळ यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. आयएएनएससोबत बोलताना हे वृत्त बकवास असल्याचं धूमाळ यांनी सांगितलं. अशा चर्चा मीडियामध्येच सुरू आहेत, असं काहीही होणार नाही. तसंच बीसीसीआयने याबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही. विराट सगळ्या फॉरमॅटमध्ये टीमचा कर्णधार राहिल, असं धूमाळ यांनी सांगितलं. विराट कोहली टेस्ट क्रिकेटमध्ये यशस्वी कर्णधार आहे. पण लिमीटेड ओव्हर क्रिकेटमध्ये त्याच्या नेतृत्वात भारताला मोठं यश मिळालं नाही. आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आली नाही, त्यामुळे रोहितला (Rohit Sharma) वनडे आणि टी-20 टीमचं कर्णधार केलं जाऊ शकतं, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये (WTC Final) न्यूझीलंडविरुद्ध भारताचा पराभव झाल्यानंतरच या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली. यावेळी विराटच्या टीम सिलेक्शनवर नाराजी व्यक्त करण्यात आली. कोहलीने फायनलमध्ये फास्ट बॉलर्ससाठी अनुकूल वातावरण असतानाही दोन स्पिनर घेऊन खेळण्याचा निर्णय घेतला. धूमळ यांनी मात्र अशी कोणतीही बैठक झाल्याचं वृत्त फेटाळलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार विराट कोहलीला आपल्या बॅटिंगवर लक्ष केंद्रीत करायचं आहे, त्यामुळे टी-20 आणि वनडे टीमचं नेतृत्व रोहितला दिलं जाऊ शकतं. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे वृत्त देण्यात आलं होतं. टी-20 वर्ल्ड कपनंतर कॅप्टन्सी सोडण्याबाबत विराट टीम मॅनेजमेंट आणि रोहित शर्मासोबतही बोलला असल्याचं या बातमीमध्ये सांगण्यात आलं आहे.
  Published by:Shreyas
  First published: