चहलनं अनुष्काकडे केली होती ‘ही’ खास मागणी, आता विराटनं त्यालाच केलं ट्रोल

चहलनं अनुष्काकडे केली होती ‘ही’ खास मागणी, आता विराटनं त्यालाच केलं ट्रोल

चहलनं एक पोस्टमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांची मस्करी केली होती. ही मस्करी त्याला आता महागात पडल्याचे दिसत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 मे : भारतीय संघाचा युवा स्पिनर युजवेंद्र चहल (yuzvendra chahal) आघाडीचा गोलंदाज आहे. चहल नेहमीच आपल्या गोलंदाजीबरोबरच सोशल मीडियावरील व्हिडीओमुळंही चर्चेत असतो. चहल इन्स्टाग्राम (instagram) आणि टिकटॉकवर (TikTok) नेहमीच मजेशीर व्हिडीओ अपलोड करत असतो. चहलनं एक पोस्टमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांची मस्करी केली होती. ही मस्करी त्याला आता महागात पडल्याचं दिसत आहे.

युजवेंद चहलनं एका व्हिडीओमध्ये अनुष्का शर्माला सांगितलं होतं की, कोहलीला सांगून चहलला ओपनिंगसाठी उतरवावे. हे प्रकरण मुळात सुरू झाले ते आयपीएलच्या एक पोस्टमुळे. आयपीएल टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं संघानं चहलच्या कूच बिहार ट्रॉफी 2008-09मध्ये खेळलेल्या एका डावाच्या आकडेवारीबद्दल माहिती दिली होती. यावर संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही चहलला ट्रोल केलं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एक पोस्ट शेअर केली होती, यात चहलनं अंडर-19 संघाकडून 135 आणि 46 धाला केल्या होत्या. चहलनं संपूर्ण स्पर्धेत 281 धावा केल्या होत्या. फ्रँचायझीनं या पोस्टमध्ये 'युजी, टॉप ऑर्डरमध्ये खेळत राहा', असे कॅप्शन दिले आहे.

वाचा-'सेहवाग जगाला खोटं सांगतोय, गंभीरला सर्व माहिती आहे', अख्तरचा खळबळजनक खुलासा

वाचा-'यूपीच्या खेळाडूंना टीम इंडियात संधी नव्हत्या पण...', भारतीय माजी खेळाडूचे विधान

यावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीने चहलला ट्रोल केलं आहे. या पोस्टवर कोहलीनं निश्चितच, आम्ही नक्कीच प्रदर्शन करणाऱ्या मॅचमध्ये याचा विचार करू, असे म्हणत चहलला ट्रोल केलं आहे.

सध्या कोरोना व्हायरसमुळं भारतात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळं 2020मध्ये होणारी आयपीएल स्पर्धाही रद्द होण्याच्या मार्गावर आहे. सध्या आयपीएल ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळं सर्व खेळाडू सध्या आपल्या घरातच कैद आहेत.

वाचा-ECB ने उडवली विराट कोहलीची खिल्ली, शेअर केला जुना VIDEO

First published: May 13, 2020, 4:04 PM IST

ताज्या बातम्या