Home /News /sport /

'यूपीच्या खेळाडूंना टीम इंडियात संधी नव्हत्या पण...', भारतीय माजी खेळाडूचे धक्कादायक विधान

'यूपीच्या खेळाडूंना टीम इंडियात संधी नव्हत्या पण...', भारतीय माजी खेळाडूचे धक्कादायक विधान

कोरोनामुळं सध्या सर्व क्रिकेटपटू घरांमध्ये कैद आहेत. अशातच हे क्रिकेटपटू सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात.

    नवी दिल्ली, 10 मे : कोरोनामुळं सध्या सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत. अर्थात याचा परिणाम क्रिकेट सामन्यांवरही झाला आहे. अनिश्चित काळासाठी सर्व सामने रद्द करण्यात आल्यामुळे सध्या सर्व क्रिकेटपटू घरांमध्ये कैद आहेत. अशातच हे क्रिकेटपटू सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. असाच भारताचा स्टार माजी फलंदाज मोहम्मद कैफने (Mohammad kaif) हॅलो अॅपवर आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी कैफला कोहली आणि सचिन यांमधील आवडता खेळाडू कोण, असे विचारल्यावर त्यानं सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) असे उत्तर दिले. मोहम्मद कैफ आजही आपल्या जबरदस्त फिल्डिंगसाठी ओळखला जातो. मात्र सुरुवातीला कैफ सचिनच्या शॉटची कॉपी करत असे. यावेळी कैफनं जॉन्टी रॉड्सनंतर विराट कोहली सर्वश्रेष्ठ फिल्डर असल्याचे सांगितले. तसेच, हार्दिक पांड्या एक चांगला खेळाडू असून, त्यानं फिटनेसकडे विशेष लक्ष दिल्यास तो एक सर्वोत्तम ऑलराउंडर खेळाडू बनेल, असे सांगितले. वाचा-ECB ने उडवली विराट कोहलीची खिल्ली, शेअर केला जुना VIDEO सर्वोत्तम फिल्डर म्हणून आजही ओळख मोहम्मद कैफ म्हणाला की, छोट्याशा शहरातील आल्यामुळे माझं स्वप्न भारतीय संघासाठी खेळणे होते. सुरुवातीला उत्तर प्रदेशमधील लोकांना क्रिकेटमध्ये संधी मिळत नव्हत्या. कैफचे वडीलही क्रिकेटपटू होते, म्हणूनच त्यानेही आपल्या वडिलांच्या मार्गाचा अवलंब केला. फिल्डिंगमधल्या चांगल्या कामगिरीमुळे सचिन आणि गांगुलीकडून हा सन्मान मिळाला आणि हा सन्मान प्रोत्साहनदायक असल्याचे कैफने सांगितले. कैफने सांगितले की, इतरांसारखे खेळण्यासाठी स्वत:मध्ये बदल करू नये, तो स्वत: छोट्याशा गावचा होता आणि तो फक्त त्याच्या खेळाचा चाहता होता. तो म्हणाला की फक्त आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत रहा. तुम्हाला नक्कीच यश मिळेल. वाचा-VIDEO:लॉकडाऊनमध्ये बदलला धोनीचा लुक,चेहरामोहरा इतका बदलला की चाहतेही नाही ओळखणार गांगुली सर्वोत्तम कर्णधार कैफने सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि एमएस धोनीला सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून निवडले. वेगवान गोलंदाजांनी झहीर खानला कपिल देव यांच्यापेक्षा वरचढ मानले. प्रशिक्षकाच्या मुद्यावर कॅफने सांगितले की राइट ग्रेग चॅपल व जॉन राइटचा सर्वोत्तम प्रशिक्षक होता. ते म्हणाले की ग्रेग चॅपेल यांच्याकडे उत्कृष्ट फलंदाजीचे तंत्र आणि टिप्स होत्या. सुरेश रैना सारख्या नव्या खेळाडूंनाही ते आवडायचे, पण काही समस्या होत्या. मोहम्मद कैफ यांनी मुलाखतीत असेही म्हटले की, जगातील कोरोना विषाणूमुळे होणारी समस्या पाहून मला अतिशय वाईट वाटत आहे. वाचा-लॉकडाऊनमध्ये सारानं बाबांसाठी बनवले खास कबाब, 60 सेकंदात सचिननं काय केलं पाहा
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या