जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 'सेहवाग जगाला खोटं सांगतोय, गंभीरला सर्व माहिती आहे', अख्तरचा खळबळजनक खुलासा

'सेहवाग जगाला खोटं सांगतोय, गंभीरला सर्व माहिती आहे', अख्तरचा खळबळजनक खुलासा

'सेहवाग जगाला खोटं सांगतोय, गंभीरला सर्व माहिती आहे', अख्तरचा खळबळजनक खुलासा

शोएब अख्तरने 16 वर्षांपूर्वी मुल्तान कसोटीबाबत सेहवागनं केलेलं वक्तव्य खोटं असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 10 मे : भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं पाकिस्तानविरुद्ध 16 वर्षांपूर्वी कसोटीमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली होती. पाकविरुद्ध मुल्तान कसोटीमध्ये 309 धावांची खेळी करत सेहवागनं इतिहास रचला होता. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिलाच क्रिकेटपटू होता. मात्र याच कसोटीवेळी आणखी एक घटना घडली होती त्याबद्दल सेहवागनेच खुलासा केला होता. आता सेहवागचं त्याबाबतचं वक्तव्य संपूर्ण खोटं असल्याचा धक्कादायक दावा पाकचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं केला आहे. मुल्तान कसोटी बाप हा बाप असतो असं सेहवागनं म्हटल्याचं साफ खोटं असल्याचा दावा शोएब अख्तरनं केला आहे. मुल्तान कसोटीत असं काही झालंच नाही असं अख्तर म्हणाला. हेलो अॅपवर बोलताना अख्तर म्हणाला की, विरेंद्र सेहवागनं सांगितलेल्या या गोष्टी खोट्या आहेत. सेहवागला त्याने कधीच हुक मारण्यासाठी सांगितलं नाही. या मुद्द्यावर गंभीर आणि सेहवागशी 2011 मध्येही चर्चा केली होती. याबद्दल गंभीरला माहिती आहे असंही अख्तरने सांगितलं. सेहवाग म्हणाला होता की, कसोटी सामन्यावेळी शोएब अख्तर इतका वैतागला की त्यानं शॉर्ट बॉल टाकायला सुरुवात केली. तेव्हा अख्तरनं सेहवागला हुक शॉट मारायला सांगितलं. त्यानंतर सेहवागनं अख्तरला सांगितलं की, नॉन स्ट्राइकला तुझा बाप उभा आहे त्याला हुक मारायला सांग. त्यावेळी नॉन स्ट्राइकला सचिन तेंडुलकर उभा होता. हे वाचा : ‘यूपीच्या खेळाडूंना टीम इंडियात संधी नव्हत्या पण…’, भारतीय माजी खेळाडूचे विधान शोएब अख्तरने या मुलाखतीत असंही सांगितलं की, मुल्तान कसोटीत कधीच सेहवागला चौकार मारण्यासाठी सांगितलं नाही. विरेंद्र सेहवागने मुल्तान कसोटीबद्दल सांगितलं होतं की त्याला फलंदाजीवेळी शोएब अख्तर सारखं चौकार मार असं म्हणत होता. यावर सेहवागनं अख्तरला विचारलं होतं की, तू गोलंदाजी करतोयस की भीक मागतोय. हे वाचा : ECB ने उडवली विराट कोहलीची खिल्ली, शेअर केला जुना VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cricket
  • First Published :
जाहिरात
जाहिरात