मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

टेस्ट कॅप्टन्सी सोडताना विराटच्या पोस्टमध्ये केवळ शास्त्री, धोनीच्या नावाचा उल्लेख, काय आहे कारण?

टेस्ट कॅप्टन्सी सोडताना विराटच्या पोस्टमध्ये केवळ शास्त्री, धोनीच्या नावाचा उल्लेख, काय आहे कारण?

Virat Kohli

Virat Kohli

भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने त्याच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

मुंबई, 16 जानेवारी: भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने त्याच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने पराभव झाल्याच्या 24 तासांमध्येच विराटने टेस्ट कॅप्टन्सीही सोडली आहे. ट्विट करत विराटने ही माहिती दिली. मात्र, विशेष म्हणजे या पोस्टमध्ये विराटने केवळ माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri)आणि माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी(MS Dhoni) केवळ यांच्या नावाच उल्लेख केला आहे.

शनिवारी आपल्या सोशल अकाऊंटवर भावुक पोस्ट लिहीत विराटने भारतीय टेस्ट टीमचे कर्णधार पद सोडत असल्याची माहिती दिली. मागच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपआधी विराट कोहलीने टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडली, यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्याआदी त्याला वनडे टीमच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आलं.

दरम्यान, विराटने लिहिलेल्या पोस्टमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे रवी शास्त्री आणि महेंद्र सिंह धोनीच्या नावाने. पोस्टमध्ये विराटने रवी शास्त्री यांचे आभार मानले आहेत. रवि भाई आणि सपोर्ट स्टाफचे आभार. जे माझ्यासारख्या एका वाहनामागे इंजीनसारखे होते. त्यांनी मला नेहमी टेस्ट क्रिकेटमध्ये अव्वल पोहचवले. तुम्ही सर्वांनी केलेला विचार हा यशस्वी करण्यात मोठी भूमिका बजावली. अशी भावना व्यक्त केली.

तर एमएस धोनी मी खुप खुप आभारी आहे. ज्याने कॅप्टनच्या रुपामध्ये माझ्यावर विश्वास केला.भारतीय क्रिकेटला पुढे नेणारी सक्षम व्यक्ती म्हणून मला दिसले. अशा आशयाची पोस्ट करत विराटने दोघांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहे.

2014 मध्ये विराट कोहलीने कसोटी फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. 33 वर्षीय या बॅट्समनने 68 सामन्यांमध्ये भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले आणि या कालावधीत 40 सामने जिंकले. 2011 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या विराटने या फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 99 सामने खेळले असून 27 शतके, 28 अर्धशतकांसह एकूण 7962 धावा केल्या आहेत.

First published:

Tags: BCCI, MS Dhoni, Ravi shashtri, Test cricket, Virat kohli