मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

RCBचा कर्णधार म्हणून विराटचा प्रवास संपला; अखेरच्या सामन्यानंतर ‘कॅप्टन’ कोहली म्हणाला...

RCBचा कर्णधार म्हणून विराटचा प्रवास संपला; अखेरच्या सामन्यानंतर ‘कॅप्टन’ कोहली म्हणाला...

RCBचा कर्णधार म्हणून विराटचा प्रवास संपला; अखेरच्या सामन्यानंतर ‘कॅप्टन’ कोहली म्हणाला...

RCBचा कर्णधार म्हणून विराटचा प्रवास संपला; अखेरच्या सामन्यानंतर ‘कॅप्टन’ कोहली म्हणाला...

बेंगलोरच्या (RCBvsKKR) पराभवामुळे कर्णधारपदाचा शेवट विराटसाठी(virat kohli ) निराशाजनक राहिला. पण, असे असले तरी सामन्यानंतर विराटने आपल्या भावना व्यक्तकरत आरसीबीच्या चाहत्यांना मोठा दिलासा दिला.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली 12 ऑक्टोबर : आयपीएल 2021मध्ये(IPL2021) एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने रॉयल चॅलेजंर्स बंगळुरुचा(RCB vs KKR) 4 गडी राखून पराभव केला. बेंगलोरच्या या पराभवामुळे त्यांचे आयपीएल 2021 मधील आव्हानही संपुष्टात आले. याशिवाय बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीचा नेतृत्वपदाचा कार्यकाळही संपला. पराभवामुळे कर्णधारपदाचा शेवट विराटसाठी निराशाजनक राहिला. पण, असे असले तरी सामन्यानंतर विराटने आपल्या भावना व्यक्त(virat kohli reacts about tenure as rcb captain) करत आरसीबीच्या चाहत्यांना मोठा दिलासा दिला.

विराटच्या नेतृत्वाखाली बंगळुरूचा हा शेवटचा सामना होता. यानंतर विराट संघाचे नेतृत्व करणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. सामन्यानंतर विराट कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आयपीएलमधील माझ्या शेवटच्या दिवसापर्यंत मी आरसीबी संघातच

विराट सामन्यानंतर त्याच्या कर्णधारपदाच्या प्रवासाबद्दल म्हणाला, ‘मी संघात अशी संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला, जिथे युवा खेळाडू येऊ शकतात आणि स्वातंत्रपणे आणि विश्वासाने खेळू शकतात. ही गोष्ट मी भारतीय संघाबाबतही केली. मी माझे सर्वोत्तम दिले. मला माहित नाही प्रतिसाद कसा मिळाला, पण मी प्रत्येकवेळी संघासाठी 120 टक्के माझे सर्वोत्तम दिले आणि यापुढेही एक खेळाडू म्हणून मी देत राहिन.

हे वाचा- IPL 2022 : विराटनंतर आणखी एक भारतीय सोडणार कॅप्टन्सी, दुसऱ्या टीमकडून खेळणार!

पुढच्या तीन वर्षांसाठी पुन्हा एकत्र येण्याची आणि पुनर्रचना करण्याची एक संधी आहे. मी बंगळुरूसोबत असणार आहे. मला निष्ठा महत्त्वाची आहे. आयपीएलमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत बंगळुरू संघात खेळेन, अशा भावना व्यक्त करत विराट कोहली आपल्या चाहत्यांना दिलासा दिला.

विराटची कर्णधार म्हणून कामगिरी

विराटच्या नेतृत्वाखाली बंगळुरूने 140 सामने खेळले आहेत. यापैकी 66 सामन्यात विजय, तर 70 सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. आणि 4 सामन्याचा निकाल लागला नाही. त्याच्या नेतृत्वाखाली २०१६ साली आरसीबीने आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्यांना सनरायझर्स हैदराबाकडून पराभव स्विकारावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

First published:

Tags: IPL 2021, RCB, Virat kohli