Home /News /sport /

IPL 2022 आधी प्रीती झिंटाला सगळ्यात मोठा धक्का, केएल राहुल सोडणार साथ!

IPL 2022 आधी प्रीती झिंटाला सगळ्यात मोठा धक्का, केएल राहुल सोडणार साथ!

आयपीएल 2018 (IPL) पासून सगळ्यात सातत्यपूर्ण रन करणारा केएल राहुल (KL Rahul) पंजाब किंग्सची (Punjab Kings) साथ सोडणार असल्याचं वृत्त आहे.

    मुंबई, 11 ऑक्टोबर : आयपीएल 2018 (IPL) पासून सगळ्यात सातत्यपूर्ण रन करणारा केएल राहुल (KL Rahul) पंजाब किंग्सची (Punjab Kings) साथ सोडणार असल्याचं वृत्त आहे. लागोपाठ 4 मोसम पंजाबकडून खेळल्यानंतर केएल राहुल आता प्रिती झिंटाच्या टीमला अलविदा करण्याच्या तयारीत आहे. आयपीएल 2017 साली दुखापतीमुळे राहुल खेळू शकला नाही, यानंतर 2018 साली पंजाबने राहुलला 11 कोटी रुपयांना विकत घेतलं. यानंतर प्रत्येक मोसमात राहुलने चमकदार कामगिरी केली. 2020 साली राहुलला पंजाब किंग्सचं कर्णधारपद देण्यात आलं, पण राहुलला टीममध्ये घेऊनही पंजाब किंग्सला आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाही. आता क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार राहुल पंजाबसोबतची 4 वर्षांची साथ आता सोडणार आहे. काही आयपीएल टीमनी 2022 सालच्या लिलावात राहुलला कॅप्टन करण्यात रस दाखवला आहे. तसंच तो 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीला विकला जाण्याची शक्यता आहे. 2018 च्या मोसमात राहुलने 659 रन केले, यानंतर 2019 साली 593 रन, 2020 साली 670 रन आणि यावर्षी 626 रन केले. सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूला मिळणारी ऑरेंज कॅपही सध्या राहुलकडेच आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या पुढच्या मोसमासाठी खेळाडू कायम ठेवण्याबाबतच्या नियमांची घोषणा केलेली नाही. राहुलने टीमसोबतच असावं असा पंजाब टीमचा आग्रह आहे, पण त्याने टीम सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर पंजाबची टीम त्याच्यावर जबरदस्ती करणार नाही. याआधीही अश्विन, रहाणे आणि शिखर धवन एका टीममधून दुसऱ्या टीममध्ये गेले, त्यामुळे राहुलची इच्छा नसेल तर पंजाबची टीमही त्याला सोडून देईल. 2014 नंतर पंजाबच्या टीमला आयपीएल प्ले-ऑफ गाठता आलेली नाही. 2018 साली अश्विनच्या नेतृत्वात ते प्ले-ऑफमध्ये पोहोचायच्या जवळ आले होते, पण दुसऱ्या राऊंडमध्ये त्यांची कामगिरी खालावली. राहुलच्या नेतृत्वात 2020 आणि 2021 साली पंजाबची टीम सहाव्या क्रमांकावर राहिली. पंजाब किंग्सची साथ सोडल्यानंतर राहुल पुढच्या मोसमात नव्या टीमचा कर्णधार बनू शकतो. याआधी राहुल आयपीएलमध्ये आरसीबी आणि हैदराबादकडून खेळला होता.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: IPL 2021, Kl rahul, Punjab kings

    पुढील बातम्या