न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर विराट भडकला, टीममधील खेळाडूंना खडसावलं

न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर विराट भडकला, टीममधील खेळाडूंना खडसावलं

न्यूझीलंडविरुद्ध भारतावर 3-0 ने पराभवाची नामुष्की ओढावल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने खेळाडूंना खडे बोल सुनावले आहेत.

  • Share this:

माऊंट माउंगानुई, 11 फेब्रुवारी : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताला 3-0 ने पराभव पत्करावा लागला. 30 वर्षानंतर एखाद्या द्विपक्षीय मालिकेत भारतावर अशा पराभवाची नामुष्की ओढावली आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने या पराभवानंतर खेळाडूंना खडे बोल सुनावले आहेत.

विराटने सामन्यानंतर बोलताना टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. विराट म्हणाला की, भारताचे क्षेत्ररक्षण आंतरराष्ट्रीय क्रिकेटला साजेसं नव्हतं. मला वाटतं की पहिल्या सामन्यात आम्ही चांगली कामगिरी केली मात्र तिनही सामन्यात ज्या पद्धतीने संघाचे क्षेत्ररक्षण होते ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दर्जाचे नव्हते. क्षेत्ररक्षण खूपच खराब होते.

क्षेत्ररक्षणासह विराटने गोलंदाजांवरही पराभवाचे खापर फोडले. मालिकेत गोलंदाजांची खराब कामगिरी टीम इंडियाच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचं विराट म्हणाला.  न्यूझीलंडने टी20 मालिका गमावल्यानंतर जो खेळ दाखवला तो पाहता एकदिवसीय मालिका विजयाचे खरे अधिकारी तेच होते. आम्ही टी20 मालिकेत चांगली कामगिरी केली पण वनडेमध्ये नव्या खेळाडूंसोबत उतरलो. त्यांच्यासाठी हा चांगला अनुभव असेल असंही विराटने सांगितलं.

आता टी-20 वर्ल्ड कपमध्ये होणार नाही नो-बॉलवरून राडा! ICCने आणला नवा नियम

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेला 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने दोन कसोटी सामने महत्वाचे असणार आहेत. त्याबद्दल विराट म्हणाला की, आमचा कसोटीचा संघ संतुलित आहे. आम्हाला कसोटी मालिकेत विजयाच्या आशा आहेत. आम्हाला अशाच मानसिकतेने मैदानात उतरण्याची गरज आहे.

7 वर्षांनंतर विराटची फ्लॉप कामगिरी! ‘या’ आकड्यांनी केली कॅप्टन कोहलीची पोलखोल

First published: February 11, 2020, 6:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading