जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / राजस्थानच्या 'रॉयल्स' विजयाने मुंबई इंडियन्स प्लेऑफ शर्यतीतून कशी पडली बाहेर? जाणून घ्या

राजस्थानच्या 'रॉयल्स' विजयाने मुंबई इंडियन्स प्लेऑफ शर्यतीतून कशी पडली बाहेर? जाणून घ्या

राजस्थानच्या 'रॉयल्स' विजयाने मुंबई इंडियन्स प्लेऑफ शर्यतीतून कशी पडली बाहेर? जाणून घ्या

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आयपीएल 2022 च्या पहिल्या आठ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. दोन सामने जिंकून संघाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला असला तरी तोपर्यंत खूप उशीर झाला होता. राजस्थानने पंजाबवर विजय मिळवल्यानंतर आयपीएल 2022 च्या प्लेऑफमधून बाद होणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कंपनी 9 मे रोजी त्यांच्या अकराव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सशी भिडणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 मे : विक्रमी पाच वेळा चॅम्पियन राहिलेला मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ आयपीएल 2022 च्या प्लेऑफ शर्यतीतून (ipl play off) बाद होणारा पहिला संघ ठरला आहे. आयपीएलच्या 52 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने शनिवारी पंजाब किंग्जचा 2 चेंडू बाकी असताना 6 गडी राखून पराभव करत सातवा विजय नोंदवला. राजस्थान रॉयल्सच्या  या विजयासह मुंबई इंडियन्सचे या स्पर्धेतील अंतिम चारमधील स्थान हुकले आहे. मुंबई इंडियन्सच्या संघासाठी हा मोसम सर्वात वाईट ठरला आहे. यावेळी त्यांनी एक नकोसा विक्रमही आपल्या नावे केलाय. या विजयासह राजस्थान रॉयल्सचे 14 गुण झाले आहेत. सध्या मुंबई इंडियन्सचे 10 सामन्यांतून दोन विजयांसह 4 गुण आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईला या मोसमात लीगमध्ये अजून 4 सामने खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत मुंबईच्या संघाने उरलेले चार सामने जिंकले तरी त्यांचे केवळ 12 गुण होतील आणि ते राजस्थानचा गुण पार करू शकणार नाहीत. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही नवीन आयपीएल फ्रँचायझींनी आधीच 12 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. ‘हे’ परदेशी क्रिकेटर्स आहेत भारताचे जावई, दोन पाकिस्तानी प्लेयर्सचाही समावेश जोफ्रा आर्चरवर खेळलेला सट्टा अयशस्वी मुंबई इंडियन्सला या मोसमात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. त्याने सलग 8 सामने गमावले. या हंगामात खेळण्यासाठी योग्य नसलेल्या जोफ्रा आर्चरला विकत घेऊन मुंबईने आयपीएल 2022 मेगा लिलावात मोठा सट्टा लावला. कर्णधार रोहित शर्मा, यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन आणि अनुभवी अष्टपैलू किरन पोलार्डही धावांसाठी झगडताना दिसले. आई हे तुझ्यासाठी.. लखनौ सुपर जायंट्सच्या खेळाडूंची जर्सी पाहून तुमचंही उर भरुन येईल! पहा VIDEO सलग 8 सामने हरणारा मुंबई पहिला संघ आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सने सलग आठ सामने गमावून एक नकोसा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. या T20 लीगच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाला पहिले 8 सामने पराभूत व्हावे लागले होते. यानंतर मुंबईने दोन सामने जिंकून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या मोसमात मुंबईने राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्सचा पराभव केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात