Home /News /sport /

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून विराट बाहेर? रोहित ऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपद

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून विराट बाहेर? रोहित ऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपद

न्यूझीलंडनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. भारताने टी20 मालिका जिंकली. मात्र एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला.

    नवी दिल्ली, 02 मार्च : न्यूझीलंडनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारताने टी20 मालिका जिंकली. मात्र एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. आता टीम इंडिया 12 मार्चपासून 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. दरम्यान, त्यापूर्वी विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यात खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. विराटला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या रोहित शर्मा दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे तोसुद्धा दक्षिण आफ्रिका दौऱ्यात एकदिवसीय मालिकेत खेळण्याचे चिन्हे कमी आहेत. रोहित शर्माला न्यूझीलंड दौऱ्यात दुकापत झाली होती. त्यानंतर एकदिवसीय आणि कसोटी मालिकेला रोहित मुकला होता. रोहित अजुन तंदुरुस्त नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत विराटलासुद्धा विश्रांती दिली तर संघाचे नेतृत्व कोणाकडे द्यायचं असा प्रश्न व्यवस्थापनासमोर असेल. दरम्यान, दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शिखर धवनचे पुनरागमन निश्चित समजलं जात आहे. न्यूझीलंड दौऱ्यात तो खेळू शकला नव्हता. मात्र विराट-रोहितच्या अनुपस्थितीत त्याच्याकडे कर्णधारपद सोपवलं जाईल का हे अद्याप स्पष्ट नाही. तर दुसरीकडे केएल राहुलच्या खांद्यावर एकदिवसीय संघाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत शेवटच्या सामन्यात रोहित शर्माला दुखापत झाल्यानंतर त्याने नेतृत्व केलं होतं. भारताना त्या सामन्यात विजय मिळवला होता. हे वाचा : विजयासाठी टीम इंडियाची अनोखी 'शक्कल' पंचांनी पकडली, विराटला मैदानातच दिली समज दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्यासाठी संघ जाहीर केला आहे. यामध्ये फाफ डुप्लेसीला संधी मिळाली आहे तर नेतृत्व क्विंटन डीकॉक याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. वेगवान गोलंदाज रबाडा दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. तर चायनामन गोलंदाज शम्सीनेही विश्रांती घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ :क्विंटन डिकॉक, तेंबा बावुमा, रेसी वान डेर डुसेन, फाफ डुप्लेसी, काइल वेरीने, हेनरिक क्लासेन, डेविड मिलर, जॉन-जॉन स्मट्स, अँडिल पेहलुकवायो, लुंगी एनगिडी, लुथो सिपामला, ब्युरेन हेंड्रिक्स, एनरिक नोकिया, जार्ज लिंडे आणि केशव महाराज हे वाचा : लाजीरवाण्या पराभवानंतर विराट भडकला! प्रेस कॉन्फरन्समध्ये विचारला उलट प्रश्न
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या