ख्राइस्टचर्च, 02 मार्च : न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली पत्रकार परिषदेत एका प्रश्नावरून भडकला. त्यानंतर विराटने पत्रकारालाच सुनावलं. दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतर विराटला पत्रकाराने विचारलं की,‘तुला आक्रमकता कमी करण्याची गरज आहे का?’ या प्रश्नावर तो भडकला. विराट म्हणाला की,‘तुम्ही अर्धवट माहिती घेऊन यायला नको. सुरुवातील तुमचे समज बरोबर करण्याची गरज आहे.’ कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टॉम लॅथम आणि केन विल्यम्सन हे बाद झाल्यानंतर विराटने आक्रमक जल्लोष केला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायर झाला. यात विराट प्रेक्षकांना अपशब्द बोलताना दिसतो. मोहम्मद शमीने पहिल्या डावात टॉम लॅथमला बाद केलं होतं तेव्हाचा व्हिडिओ आहे. यावरूनच कोहलीला प्रश्न विचारण्यात आला होता. ‘‘विल्यम्सन बाद झाल्यानंतर प्रेक्षकांकडे बघत आक्रमक होणं या मैदानावरील तुझ्या वर्तनाबाबत काय प्रतिक्रिया आहे. एक कर्णधार म्हणून मैदानावर चांगलं उदाहरण समोर ठेवायला हवं असं वाटत नाही का?’’,असा प्रश्न पत्रकाराने विचारला होता. यावर विराट पत्रकारावर भडकला आणि म्हणाला की,‘तुम्हाला काय वाटतं.’ त्यानंतर मी तुम्हाला प्रश्न विचारला असल्याचं पत्रकाराने सांगितलं. तेव्हा पुन्हा विराटने पत्रकाराकडेच उत्तर मागितलं. पत्रकाराने म्हटलं की,‘तु चांगलं उदाहरण सर्वांसमोर ठेवलं पाहिजेस.’
Congratulations to New Zealand on winning the Test series. #NZvIND
— BCCI (@BCCI) March 2, 2020
Details👉 https://t.co/VTLQt4iEFz pic.twitter.com/gNq2DGHxWm
विराट म्हणाला की,‘तुम्हाला खरं काय ते जाणून घेण्याची गरज आहे. प्रत्यक्षात काय घडलं हे माहिती असावं आणि त्यानंतर तुम्ही एका चांगल्या प्रश्नासह याठिकाणी यावं. तुम्ही अर्धवट माहिती आणि प्रश्न घेऊन इथं येऊ शकत नाही. जर वाद निर्माण करायचा असेल तर ही योग्य जागा नाही. याबद्दल मॅच रेफरींशी चर्चा केली. जे काही घडलं त्याबद्दल त्यांना काही अडचण नव्हती. हे वाचा : न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाचा व्हाइट वॉश, कसोटी वर्ल्ड कपची वाट खडतर न्यूझीलंड दौरा विराटसाठी आतापर्यंतचा सर्वात वाईट दौऱा ठरला आहे. या दौऱ्यात त्याला फक्त एकच अर्धशतक करता आलं. दोन कसोटी सामन्यांच्या चार डावात त्याला 20 पेक्षा अधिक धावा एका डावात करता आल्या नाहीत. भारताविरुद्धच्या मालिका विजयाने न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. हे वाचा : विजयासाठी टीम इंडियाची अनोखी ‘शक्कल’ पंचांनी पकडली, विराटला मैदानातच दिली समज

)







