...आणि धावांसाठी झगडणाऱ्या विराटने त्याच्या लहानपणीच्या प्रशिक्षकांना केला फोन

...आणि धावांसाठी झगडणाऱ्या विराटने त्याच्या लहानपणीच्या प्रशिक्षकांना केला फोन

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या बॅड पॅचमधून जात असून आक्रमकतेवरून त्याला ट्रोल केलं जात आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 03 मार्च : भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला रनमशिन म्हणून ओळखलं जातं. तो जेव्हापण मैदानात उतरतो तेव्हा कोणतातरी विक्रम नोंदवतो. पण न्यूझीलंड दौऱ्यावर त्याच्या नावावर नको असलेले विक्रम नोंद झाले. त्यामुळे विराटवर आता अनेक दिग्गज क्रिकेटपटूंसह चाहत्यांनीही टीका करायला सुरुवात केली आहे. गेल्या 22 डावात विराट कोहलीला शतक झळकावता आलेलं नाही. न्यूझीलंड दौऱ्यात टी20, कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतही त्याची बॅट शांतच राहिली. यामुळे त्रासलेल्या विराटनं त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांना फोन केला.

विराटने आपल्याला फोन केल्याचं स्वत: राजकुमार शर्मा यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले की,'प्रत्येक खेळाडू बॅड पॅचमधून जात असतो. याची काळजी करण्याचं कारण नाही. तो एक चांगला खेळाडू आहे आणि त्याला माहिती आहे की काय चुकत आहे. आम्ही त्यावर बोललो आहे. तो लवकरच दमदार पुनरागमन करेल.'

आक्रमक स्वभावामुळे विराटला टार्गेट केलं जात आहे. त्याबद्दल राजकुमार शर्मा म्हणाले की, त्यानं कधीच आक्रमकपणा आणि गैरवर्तन यांचीतील रेषा पार केली नाही. जेव्हा तो चांगली कामगिरी करतो तेव्हा त्याच्या आक्रमक स्वभावाचे कौतुक केलं जातं. मला वाटतं की आक्रमकता त्याची भक्कम बाजू आहे. पण आक्रमकता आणि गैरवर्तन यांच्यात एक रेषा आहे. त्यानं ही रेषा कधीच ओलांडली नाही. आक्रमकता त्याला चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा देते.

कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टॉम लॅथम आणि केन विल्यम्सन हे बाद झाल्यानंतर विराटने आक्रमक जल्लोष केला होता. त्यावेळी प्रेक्षकांकडे पाहून त्यांना शांत बसण्याचा इशाराही विराटनं केला. यावरूनच त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत होतं.

हे वाचा : लेकीला घेऊन मैदानावर आला भारतीय क्रिकेटपटू, तुम्ही ओळखलंत का?

विराटला पत्रकाराने विचारलं की,'तुला आक्रमकता कमी करण्याची गरज आहे का?' या प्रश्नावर तो भडकला. विराट म्हणाला की,'तुम्हाला खरं काय ते जाणून घेण्याची गरज आहे. प्रत्यक्षात काय घडलं हे माहिती असावं आणि त्यानंतर तुम्ही एका चांगल्या प्रश्नासह याठिकाणी यावं. तुम्ही अर्धवट माहिती आणि प्रश्न घेऊन इथं येऊ शकत नाही. जर वाद निर्माण करायचा असेल तर ही योग्य जागा नाही. याबद्दल मॅच रेफरींशी चर्चा केली. जे काही घडलं त्याबद्दल त्यांना काही अडचण नव्हती.'

हे वाचा : क्रिकेटपटू चहलसोबत TikTok VIDEO करणारी ती तरुणी आहे तरी कोण?

न्यूझीलंड दौरा विराटसाठी आतापर्यंतचा सर्वात वाईट दौऱा ठरला आहे. या दौऱ्यात त्याला फक्त एकच अर्धशतक करता आलं. दोन कसोटी सामन्यांच्या चार डावात त्याला 20 पेक्षा अधिक धावा एका डावात करता आल्या नाहीत. भारताविरुद्धच्या मालिका विजयाने न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

VIDEO : विराटची लाजीरवाणी कामगिरी, पाकच्या क्रिकेटपटूने केलं समर्थन

First published: March 3, 2020, 2:37 PM IST

ताज्या बातम्या