भारताचा गोलंदाज युझवेंद्र चहल खेळाशिवाय त्याच्या मैदानाबाहेर चालणाऱ्या दंगामस्तीसाठी ओळखला जातो. बीसीसीआयने तर खास चहल टीव्हीच्या माध्यमातून संघातील काही खेळाडूंचे मजेशीर इंटरव्ह्यूसुद्धा घेतले आहेत.
चहल संघातील खेळाडूंना खोचक प्रश्न विचारतो. संघाच्या बसमध्ये, ड्रेसिंग रुममध्ये काय चाललंय याची माहिती व्हिडिओतून देत असतो.
युझवेंद्र चहल आणखी एका कारणाने चर्चेत आला आहे तो म्हणजे टिकटॉक व्हिडिओ. भारत दौऱ्यावर असणाऱ्या चहलनं टिकटॉकवर अनेक व्हिडिओ टाकले आहेत.
टिकटॉकवर चहलने गेल्या काही दिवसांत टाकलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुणीही दोन-तीनवेळा दिसली आहे. तिने इन्स्टाग्रामवर चहल आपला मित्र असल्याचं म्हटलं आहे.
रमीत संधू असं तिचं नाव असून ती मॉडेल आणि सिंगर आहे. आता ती जवानी जानेमन या चित्रपटातही दिसणार आहे.