मुंबई, 12 मार्च : सोशल मीडियावर ट्रोल करायला कोणतंही कारण पुरेसं असतं. त्यासाठी काहीही लॉजिक ट्रोलर्स शोधत असतात. आता विराट कोहलीच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर बंदी घाला, त्याच्या शुभेच्छा म्हणजे शाप आहेत असं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे. एवढंच नाही चक्क यासाठी मोहीम उघडली आहे. फक्त कोहलीच नाही तर भारताचा माजी तडाखेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. नुकतीच महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा पार पडली. यात अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियानं पराभूत केलं. या सामन्या आधी विराट आणि सेहवागनं महिला संघाला शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र संघाला पराभव पत्करावा लागला.
टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं एकतर्फी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 184 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 99 धावांपर्यंतच मजल मारता आली. या पराभवानंतर नाराज झालेल्या चाहत्यांनी विराट कोहली आणि विरेंद्र सेहवाग यांना ट्रोल केलं आहे. अभिमन्यू ठाकूर नावाच्या चाहत्यानं Change.org वर मोहीम सुरु केली आहे. यामध्ये विराट कोहली आणि विरेंद्र सेहवाग यांचे सोशल मीडिया अकाउंट बंद करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे अनेक चाहत्यांनी याचं समर्थन केलं आहे.
भारतीय क्रिकेट संघ 2014 पासून आयसीसी स्पर्धेत पराभूत होत आहे. पुरुषांचा संघ असो की महिलांचा दोन्ही संघ नॉक आउट, सेमीफायनल किंवा फायनलमध्ये पराभूत होत आहेत. 2014 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया फायनलमध्ये पराभूत झाली होती. त्यानंतर 2015 च्या वर्ल्ड कप सेमीफायनलला पराभवाचा धक्का बसला. 20116 मध्ये पुन्हा टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्येच पराभूत व्हावं लागलं.
महिला क्रिकेट संघाला 2017 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडने पराभूत केलं. त्यानंतर 2018 ला महिला टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत सेमीफायनलमध्ये पराभूत झाला. 2019 च्या वर्ल्डकपमध्येही सेमीफायनलमध्ये आव्हान संपुष्टात आलं. त्यानंतर आताही फायनलमध्ये पोहचल्यानंतर पराभव पत्करावा लागला.
पाहा VIDEO : पुजारा बाद होता पण नियमाने वाचवलं, पंच आणि खेळाडूंमध्ये झाला वाद
भारताला विजेतेपद पटकावता आलं नसलं तरी गेल्या काही वर्षांत भारतीय संघाचा खेळ निश्चितच उंचावला आहे. इतकंच काय विजेतेपदाचा प्रबळ दावेदारही मानला जातो. मात्र शेवटी खेळात काहीही होऊ शकतं. भारतीय संघाला शुभेच्छा केवळ सेहवाग किंवा विराट यांनी नाही तर सर्व देशवासियांनी आणि चाहत्यांनी दिल्या आहेत. विराट-सेहवागच्या शुभेच्छांचा आणि पराभवाचा संबंध नसतानाही अजब लॉजिक लावत ट्रोलर्सकडून काहीही ट्रेंड केलं जात आहे.
पाहा VIDEO : मास्टर ब्लास्टरची खिलाडूवृत्ती, पंचांनी बाद देण्याआधी सचिनने सोडलं मैदान
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket