Home /News /sport /

VIDEO : पुजारा बाद होता पण नियमाने वाचवलं, पंच आणि खेळाडूंमध्ये झाला वाद

VIDEO : पुजारा बाद होता पण नियमाने वाचवलं, पंच आणि खेळाडूंमध्ये झाला वाद

सौराष्ट्रकडून खेळणाऱा चेतेश्वर पुजारा पायचित झाल्याचं अपील पंचांनी फेटाळून लावलं. त्यानंतर डिआरएसमध्ये बंगालच्या बाजूने निर्णय आला पण एका नियमामुळे पुजारा नाबाद ठरला.

    राजकोट, 11 मार्च : रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रने पहिल्या डावात 425 धावा केल्या. सौराष्ट्रची अवस्था एकवेळ 5 बाद 206 अशी झाली होती. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि अर्पित वास्वडा यांनी संघाचा डाव सावरला. पुजाराने अर्धशतक केलं तर वास्वडाने शतक झळकावलं. यामुळेच सौराष्ट्रला 425 धावांपर्यंत मजल मारता आली. दरम्यान, सामन्यावेळी 98 व्या षटकात पायचितच्या अपीलमुळे पंच आणि खेळाडू एकमेकांना भिडले. बंगालचा खेळाडू शाहबाझ अहमद गोलंदाजी करत असताना चेतेश्वर पुजारा फलंदाजी करत होता. त्याचा एक चेंडू पुढे येऊन टोलावण्याचा प्रयत्न पुजाराने केला. मात्र चेंडू बॅटला न लागता थेट पॅडवर आदळला. त्यानंतर शाहबाझ अहमदनं पायचितचं अपील केलं. मैदानावरील पंचांनी अपील फेटाळल्यानं बंगालच्या संघाने डीआरएसचा निर्णय घेतला. DRS मध्ये चेंडू पॅडवर आदळल्याचं दिसत होतं. तसंच चेंडू स्टम्पवर जात असल्याचंही त्यात दिसले. मात्र घरेलू क्रिकेटमधील एका नियमामुळे पुजाराला नाबाद ठरवण्यात आलं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये फलंदाज क्रीजपासून 9 फूट अंतरावर असेल तर त्याला पायचित ठरवता येत नाही. देशांतर्गत क्रिकेटसाठी बीसीसीआय़चा हा नियम आहे. त्यामुळे पुजारा नाबाद ठरला. मात्र दरम्यान पंच आणि बंगालचे खेळाडू यांच्यात वाद झाला. हे वाचा : सचिनच्या निर्णयावर सेहवाग झाला नाराज, सामना जिंकल्यानंतर केलं मोठं वक्तव्य अर्धशतकी खेळी करणारा चेतेश्वर पुजारा पहिल्या दिवशी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला न येता सहाव्या क्रमांकावर आला होता. तब्येत बिघडल्यानं तो रिटायर्ड हर्ट झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यानं संयमाने फलंदाजी करत डाव सावरला. पाहा VIDEO : मास्टर ब्लास्टरची खिलाडूवृत्ती, पंचांनी बाद देण्याआधी सचिनने सोडलं मैदान
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Bengal, Ranji trophy, Sourashtra

    पुढील बातम्या