अनुष्काने विराटला टाकला बाऊन्सर, लॉकडाऊनमध्ये क्रिकेट खेळताना विरुष्काचा VIDEO व्हायरल

अनुष्काने विराटला टाकला बाऊन्सर, लॉकडाऊनमध्ये क्रिकेट खेळताना विरुष्काचा VIDEO व्हायरल

जवळपास दोन महिन्यांपासून सर्व व्यवहार बंद आहेत. त्यामुळेच की काय आता विराट अनुष्का या दोघांनी त्यांच्या सोसायटीमध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.

  • Share this:

मुंबई, 16 मे : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांचे क्वारंटाइन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. लॉकडाऊनमध्ये दोघांचे फनी व्हिडीओ प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडत आहेत. दरम्यान जवळपास दोन महिन्यांपासून सर्व व्यवहार बंद आहेत. त्यामुळेच की काय आता विराट अनुष्का या दोघांनी त्यांच्या सोसायटीमध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. दोघांचा क्रिकेट खेळताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यामध्ये सुरुवातीला अनुष्काच्या हातात बॅट असते. विराटने तिला काही अंडरआर्म बॉल टाकल्यानंतर तो फलंदाजी करायला येतो. अनुष्का पहिलाच बॉल त्याला बाऊन्सर टाकते, त्यावर विराट जोरदार फटका मारतो. पण तिच्या दुसऱ्या वाइड बॉलवर मात्र विराटला फलंदाजी करता येत नाही.

(हे वाचा-ए. श्रीसंतच्या चाहत्यांसाठी खूशखबर, माजी क्रिकेटपटू करणार मराठी सिनेमात पदार्पण)

विराट अनुष्काचे सध्या अनेक व्हिडीओ व्हायर होत आहेत. अनुष्काने विराटचे केस कापताना देखील व्हिडीओ पोस्ट केला होता. तसंच दोघेही सोशल मीडियावर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींबाबत अपडेट देत असतात. दरम्यान दोघांचा क्रिकेट खेळाताना व्हिडीओ विराट अनुष्काच्या एका फॅनपेजने ट्विटरवर पोस्ट केला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम पुढे ढकलण्यात आला आहे. परिणामी आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला मैदानावर खेळताना पाहण्याची संधी लवकर येईल असं चिन्ह दिसत नाही आहे. त्यामुळे विराट-अनुष्काच्या या व्हिडीओला अनेकांनी पसंती दिली आहे. विराटच्या ज्या फॅनने हा व्हिडीओ शेअर केला आहे त्याने कॅप्शन दिले आहे की, 'अखेर अनेक दिवसांनी विराटला बॅटिंग करताना पाहिलं'. विराटच्या अनेक चाहत्यांनी देखील यावर कमेंट्स केल्या आहेत. लवकरच कोरोना आणि लॉकडाऊन संपून क्रिकेटचा आनंद घेता यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

First published: May 16, 2020, 1:39 PM IST

ताज्या बातम्या