मुंबई, 16 मे : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू एस. श्रीसंत (S. Sreesanth) त्याच्या वादग्रस्त कारकिर्दीमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. दरम्यान गेल्या काही काळापासून चित्रपट सृष्टीत आपले स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आता तो मराठी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश करणार आहे. याबाबत स्वत: श्रीसंतने माहिती दिली आहे. श्रीसंतने हेलो (Helo) अॅपवर लाइव्ह येत याबाबत माहिती दिली. त्यामुळे श्रीसंतचे चाहते याबाबत अधिक उत्सुक आहेत.
शुक्रवारी HELO अॅपवर केलेल्या लाईव्हमध्ये श्रीसंतने सांगितले की आतापर्यंत मी ज्या काही भूमिका केल्या त्यातील ही भूमिका सर्वोत्तम असणार आहे. या मराठी चित्रपटाचे नाव देखील त्याने घोषित केले. या चित्रपटाचं नाव 'मुंबईचा वडापाव' असल्याची माहिती श्रीसंत याने दिली आहे. दरम्यान या चित्रपटाचे शूटिंग पुणे आणि नाशिक याठिकाणी होण्याची शक्यता आहे. श्रीसंतच्या या चित्रपटात मल्याळम आणि मराठी चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध कलाकारही दिसण्याची शक्यता आहे.
(हे वाचा-राजकीय नेत्याशी 'अप्सरा' सोनाली कुलकर्णीचं लग्न? अभिनेत्रीने केला 'हा' खुलासा)
View this post on Instagram
श्रीसंतची कमी क्रिकेट कारकीर्द विशेष वादग्रस्त ठरली. त्यांनतर त्यांने 2017 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याने 'अक्सर-2' हा सिनेमा केला. त्यानंतर श्रीसंत बिग बॉसमध्ये देखील दिसला होता.
अन्य बातम्या
लॉकडाऊनमध्ये रविना टंडनचा बोल्ड अंदाज, सोशल मीडियावर 'बिकिनी' PHOTO व्हायरल
आईच्या त्या शब्दांनी मुलाखत सुरू असताना रणवीरला कोसळलं रडू, भावूक VIDEO व्हायरल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: S sreesanth