मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Anushka-Virat: अनुष्का-विराटचा मुंबईच्या रस्त्यावर स्कूटरने फेरफटका; VIDEO होतोय VIRAL

Anushka-Virat: अनुष्का-विराटचा मुंबईच्या रस्त्यावर स्कूटरने फेरफटका; VIDEO होतोय VIRAL

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे सेलिब्रेटी कपल सतत प्रसिद्धीझोतात असतात.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे सेलिब्रेटी कपल सतत प्रसिद्धीझोतात असतात.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे सेलिब्रेटी कपल सतत प्रसिद्धीझोतात असतात.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 21 ऑगस्ट-   अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे सेलिब्रेटी कपल सतत प्रसिद्धीझोतात असतात. भारतीय क्रिकेटर विराट कोहलीला लोकांनी नेहमीच मैदानावर खेळताना पाहिलं आहे. तसेच विदेशात भटकंती करताना पाहिलं आहे. मात्र भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. विराट नुकतंच मुंबईच्या रस्त्यावर अनुष्कासोबत स्कुटीवरुन फिरताना दिसून आला. या जोडप्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचं नाव जगातील सर्वाधिक लोकप्रिय सेलेब्रेटींच्या यादीत समाविष्ट आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर प्रचंड फॉलोअर्स आहेत. जगातील सर्वात जास्त फॉलोअर्स असणाऱ्या सेलिब्रेटींच्या यादीत विराट १७ व्या स्थानावर आहे. आणि देशात तो पहिल्या स्थानावर आहे. क्रिकेटर सतत आपल्या दौऱ्या संदर्भात आणि विविध सामन्यां संदर्भात सोशल मीडियावरुन माहिती देत असतो. विराटला लोकांनी नेहमीच मैदानावर सराव करताना, जिममध्ये वर्कआउट करताना आणि विदेशात भटकंती करतांना पाहिलं आहे.

परंतु आज क्रिकेटर चक्क मुंबईच्या रस्त्यांवर बाईकने फेरफटका मारताना दिसून आला. इतकंच नव्हे तर यावेळी पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मासुद्धा मागे बसलेली होती. या दोघांनी बाईक राईडचा आनंद घेतला. वास्तविक अनुष्का आणि विराट एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी आले होते. शूटिंग संपवून परत जाताना त्यांनी प्रवासासाठी कार नव्हे तर बाईकची निवड केली. विराट बाईक चालवत होता तर अनुष्का त्याच्या मागे बसली होती. यावेळी दोघानीही हेल्मेट घातलं होतं. सेलिब्रेटीच्या चाहत्यांना त्यांचा हा अंदाज फारच रोमँटिक वाटतं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.विरल भयानीने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

(हे वाचा:Katrina Kaif Pregnancy: विकीसोबत क्लिनिकमध्ये पोहोचली कतरिना कैफ; प्रेग्नेंसीच्या चर्चांनी धरला जोर )

अनुष्का शर्मा ही बॉलिवूडमधील प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचासुद्धा मोठा चाहतावर्ग आहे. विराटसोबत लग्न झाल्यानंतर अनुष्का आपल्या खाजगी आयुष्याचा आनंद घेत होती. त्यामुळे ती पडद्यापासून दूर होती. आता लेक वामिकाला जन्म दिल्यानंतर अनुष्का पुन्हा एकदा चित्रपटांकडे वळली आहे. अनुष्का आणि विराटच्या जोडीला प्रचंड पसंत केलं जातं. आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून हे दोघेही सतत एकमेकांसोबत रोमँटिक वेळ घालवत असतात.

First published:

Tags: Anushka sharma, Bollywood News, Entertainment, Virat anushka, Virat kohli