जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 Mumbai League : ‘पहले बाप मैच जीतता था, अब बेटा भी’

T20 Mumbai League : ‘पहले बाप मैच जीतता था, अब बेटा भी’

T20 Mumbai League  : ‘पहले बाप मैच जीतता था, अब बेटा भी’

आकाश टायगर्सकडून खेळणाऱ्या अर्जुननं आपल्या पदार्पणातच पहिली विकेट घेतली.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 14 मे: मुंबई इंडियन्स संघानं आयपीएलच्या बाराव्या हंगामात चेन्नईला केवळ एका धावानं पराभूत केलं. त्यामुळं आता आयपीएलनंतर सध्या मुंबईत चर्चा आहे ती मुंबई क्रिकेट लीगची. मुंबईतील खेळाडूंना चांगलं व्यासपीठ मिळावं आणि त्याचा फायदा त्यांना व्हावा याकरिता मुंबई क्रिकेट असोसिएशच्या वतीने मागच्या वर्षीपासून मुंबई टी-20 लीगलला सुरवात झाली. आजपासून सरुवात झालेल्या या सामन्यात पहिला सामना आकाश टायगर्स एमडब्लूएस विरुद्ध ट्रम्फ नाईट मुंबई नॉर्थ ईस्ट यांच्यात सामन्यात आकाश टायगर्सनं बाजी मारत 5 विकेटनं सामना जिंकला. दरम्यान या सामन्यातून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुननं फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये सर्वोत्तम खेळी केली. अर्जुननं मुंबई ट्वेंटी-20 लीगमध्ये मंगळवारी पदार्पण केले. दरम्यान आपल्या पदार्पणातच त्यानं महत्त्वाची विकेट घेतली. आकाश टायगर्स एमडब्लूएस संघाकडून पदार्पण करणाऱ्या अर्जुनने ट्रम्फ नाईट मुंबई नॉर्थ ईस्ट संघाला मोठा धक्का दिला. अर्जुनने सामन्याच्या चौथ्याच षटकात नाईटचा सलामीवीर करण शाहला बाद केले. अर्जुनच्या गोलंदाजीवर करणने टोलावलेला चेंडू आकर्षित गोमेलने टिपला. या सामन्यात ट्रम्फ नाईट यांनी प्रथम फलंदाजी करताना आकाश टायगर्स संघाला 147 धावांचे आव्हान दिले आहे. तर फलंदाजी करताना 121.05च्या स्ट्राईक रेटनं 19 चेंडूत 23 धावा केल्या. यात 1 षटकार आणि 1 चौकार यांचा समावेश होता. त्याच्या या खेळीच्या जोरावर आकाश टायगर्सनं सामना 5 विकेटनं जिंकलाय. या सामन्यानंतर सचिनचा बालमित्र आणि भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी, ‘पहले बाप मैच जीतता था, अब बेटा भी, अश्या शब्दात ट्विट करत अर्जुन तेंडुलकरसोबत फोटो अपलोड केला आहे.

    जाहिरात

    दरम्यान या सामन्यात एक अनोखा योगायोग दिसून आला. अर्जुननं 14 मे रोजी वानखेडेवरुन आपला पहिला टी-20 सामना खेळला तर, सचिननं आजच्याच दिवशी वानखेडेवर मुंबई इंडियन्सकडू आपला पहिला सामना खेळला होता. दरम्यान , अर्जुन तेंडुलकरनं याआधी मुंबईकडून 14, 16 आणि 19 वर्षांखालील संघात खेळण्याचा अनुभव आहे.

    याशिवाय मागच्या वर्षी 19 वर्षांखालील श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो सहभागी झाला होता. त्यात त्यानं तीन विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, त्यानं डॉ. डी वाय पाटील ट्वेंटी-20 ट्रॉफीत उल्लेखनीय कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीच्या जोरावरच त्याची वर्णी मुंबई लीगमध्ये लागली. मुंबई क्रिकेट असोसिएशनं 2018 पासून मुंबई ट्वेंटी-20 लीगला सुरुवात झाली. या लीगमुळं मुंबईमधील युवा खेळाडूंना एक नवीन संधी मिळाली आहे. या लीगमध्ये सहा संघांचा समावेश होता. वाचा- वर्ल्ड कपवर फिक्सिंगचं सावट, ‘हा’ असेल ICCचा गेम प्लॅन World Cup : ‘ही’ एक चूक पडणार महागात, विराटला ‘गंभीर’ इशारा World Cup : ‘भारताला चौथ्या क्रमांकाची चिंता नाही, आहेत बरेच पर्याय पण…’ शेतकऱ्याची लेक चालली सासरला तेही थेट हेलिकॉप्टरने, पाहा हा VIDEO

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात