मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Vinod Kambli: विनोद कांबळीची अडचण दूर, एक लाख पगाराच्या ऑफर लेटरसह कंपनीचे चेअरमन कांबळीच्या घरी

Vinod Kambli: विनोद कांबळीची अडचण दूर, एक लाख पगाराच्या ऑफर लेटरसह कंपनीचे चेअरमन कांबळीच्या घरी

विनोद कांबळी

विनोद कांबळी

Vinod Kambli: विनोद कांबळीला एक लाख पगाराची ऑफर देणारे सह्याद्री फायनान्स कंपनीचे चेअरमन ऑफर लेटरसह कांबळीच्या घरी पोहोचले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 02 सप्टेंबर: विनोद कांबळी हे नावं भारतीय क्रिकेटला नवं नाही. नव्वदच्या दशकात विनोद कांबळी हा भारतीय संघाचा अविभाज्य भाग होता. कसोटी आणि वन डेत विनोदनं अनेक मोठ्या खेळी उभारल्या. पण काही वर्षानंतर विनोद कांबळीची कारकीर्द उतरतीला लागली. अनेक वादात तो अडकला आणि क्रिकेटच्या क्षितिजावरुन हा सूर्य हळूहळू  अस्ताला गेला. इतकंच नव्हे तर विनोदची कारकीर्दीसारखीच त्याची आर्थिक स्थितीही ढासळू लागली. काही दिवसांपूर्वी विनोदनं आपण केवळ बीसीसीआयच्या पेन्शनवर गुजराण करत असल्याचं बोलून दाखवलं. आणि एमसीएकडे काम देण्याची विनंती केली होती.

उद्योजकाकडून विनोदला ऑफर

दरम्यान विनोदच्या या विनंतीनंतर एमसीए नाही पण नवी मुंबईतील एका उद्योजकानं मात्र विनोदला एक ऑफर दिली. तीही महिना एक लाख पगाराची. सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स या कंपनीकडून विनोदला ही नोकरीची ऑफर आली. या कंपनीचे चेअरमन संदीप थोरात यांनी थेट विनोदच्या घरी जाऊन त्याला ऑफर लेटर दिलं. आणि ही ऑफर विनोद कांबळीनं स्वीकारल्याचं कळतंय. त्यामुळे भारतीय संघाचा हा माजी कसोटीवीर कंपनीच्या मुंबईतल्या शाखेचा मानद संचालक म्हणून काम पाहिल.

विनोदची क्रिकेट कारकीर्द

विनोदनं आपल्या कारकीर्दीची सुरुवात शालेय वयापासून केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्यानं हॅरिस शिल्डमध्ये केलेला 664 धावांच्या भागीदारीचा विक्रम आजही अबाधित आहे. विनोदनं भारताकडून 17 कसोटी आणि 104 वन डे सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. 2000 साली विनोदनं आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

हेही वाचा - US Open 2022: राफेल नदालनं आपल्याच नाकावर मारुन घेतली रॅकेट, पाहा US ओपनच्या सामन्यात काय घडलं?

सचिनच्या अकादमीत प्रशिक्षक

युवा क्रिकेटपटूंना जागतिक स्तरावरच्या प्रशिक्षण सुविधा पुरवण्यासाठी सचिन तेंडुलकर ग्लोबल क्रिकेट अकादमीची 2019 साली स्थापना झाली होती. सचिनच्या या अकादमीत विनोद कांबळीकडे प्रशिक्षकपद सोपवण्यात आलं होतं.त्यासाठी कांबळीनं सचिनचे आभार मानले होते.

First published:

Tags: Sports, Vinod kambli