जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / US Open 2022: राफेल नदालनं आपल्याच नाकावर मारुन घेतली रॅकेट, पाहा US ओपनच्या सामन्यात काय घडलं?

US Open 2022: राफेल नदालनं आपल्याच नाकावर मारुन घेतली रॅकेट, पाहा US ओपनच्या सामन्यात काय घडलं?

राफेल नदालला दुखापत

राफेल नदालला दुखापत

US Open 2022: नदालनं सध्या अमेरिकन ओपनच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली आहे. पण याच सामन्यात त्याला एका दुखापतीला सामोरं जावं लागलं. पण तरीही नदालनं हा सामना जिंकून तिसरी फेरी गाठली.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    न्यूयॉर्क, 1 सप्टेंबर: अमेरिकन ओपन (U.S. Open 2022) ही यंदाच्या वर्षातील शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा सध्या सुरू आहे. आजवर 22 ग्रँड स्लॅम (Grand Slam) विजेतेपदं पटकावणारा स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालकडून (Rafael Nadal) यंदा प्रेक्षकांच्या अनेक अपेक्षा आहेत. नदालनं सध्या अमेरिकन ओपनच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली आहे. पण याच सामन्यात त्याला एका दुखापतीला सामोरं जावं लागलं. या सामन्यासाठी नदाल कोर्टवर उतरला पण सामन्यादरन्यान त्याच्या नाकाला दुखापत झाली. पण तरीही नदालनं हा सामना जिंकून तिसरी फेरी गाठली. नदालनं 36 व्या वर्षीही टेनिसमध्ये लागणारा कमालीचा फिटनेस टिकवून ठेवला आहे. अमेरिकन ओपनच्या दुसऱ्या फेरीत इटलीच्या फॅबियो फॉगनिनीसोबत सामन्यात त्याचा प्रत्यय आला. या सामन्यात स्वतःचं रॅकेट नदालच्या नाकावर लागलं त्यामुळे रक्तस्त्रावही झाला. त्यावेळी नदाल त्यावेळी पहिला सेट हरल्यानंतर 2-6, 6-4, 6-2, असा आघाडीवर होता. पण चौथ्या सेटदरम्यान चुकून नदालचंच रॅकेट त्याच्या नाकावर आदळलं आणि त्यातून रक्त येऊ लागलं. कोर्टवरच प्राथमिक उपचार घेऊन नदाल पुन्हा खेळण्यासाठी सज्ज झाला आणि त्यानं चौथा सेट 6-1 असा जिंकून सामनाही खिशात घातला. नदालची हसत हसत प्रतिक्रिया मॅचनंतर नदालने टेनिस कोर्टवरच्या या प्रसंगाबाबत एकदम हलकीफुलकी प्रतिक्रिया दिली. याआधी असं कधी घडलं होतं का, असं विचारल्यावर ‘गोल्फ कोर्सवर असं झालं होतं, मात्र टेनिस रॅकेटनं हे पहिल्यांदाच झालं आहे,’ असं त्यानं सांगितलं. सुरुवातीला थोडी चक्कर आल्यासारखं वाटलं. तेव्हा थोडं दुखतही होतं, असंही त्यानं सांगितलं. पुरुष एकेरीत 22 ग्रँडस्लॅम जिंकणारा राफेल नदाल हा एकमेव खेळाडू आहे. शुक्रवारी झालेल्या या घटनेमुळे आर्थर अस स्टेडियममधला खेळ जवळपास पाच मिनिटं थांबला होता. घटना घडल्यावर लगेचच नदालनं त्याचा चेहरा दोन्ही हातांनी झाकून घेतला होता. त्यानंतर नाकावर औषधोपचार करून पट्टी लावण्यात आली.

    जाहिरात

    पुन्हा अमेरिकन ओपन जिंकण्याची संधी क्ले कोर्टचा बादशहा असणाऱ्या नदालनं आजवर 4 वेळा अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आहे. यंदा या स्पर्धेत जगातला नंबर वन टेनिसस्टार नोवाक ज्योकोविच आणि महान टेनिसवीर रॉजर फेडरर खेळताना दिसणार नाही. त्यामुळे विजेतेपद पटकावण्याची नदालसमोर मोठी संधी आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात