सौरव गांगुलीशी भिडला विनोद कांबळी, 'या' मुंबईकर खेळाडूला केला विरोध

शुभमन गील आणि अनुभवी अजिंक्य रहाणे यांना संधी दिली नाही म्हणून भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं नाराजी व्यक्त केली होती.

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2019 05:17 PM IST

सौरव गांगुलीशी भिडला विनोद कांबळी, 'या' मुंबईकर खेळाडूला केला विरोध

मुंबई, 25 जुलै : वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ आता 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. याकरिता निवडण्यात आलेल्या भारतीय संघात युवा खेळाडूंचा भरणा अधिक आहे. दरम्यान यात युवा खेळाडू शुभमन गील आणि अनुभवी अजिंक्य रहाणे यांना संधी दिली नाही म्हणून भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान निवड समितीच्या निर्णयावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र भारताचा माजी क्रिकेटर विनोद कांबळीनं गांगुलीच्या मतांना खोटे ठरवत, निवड समितीची पाठराखण केली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्याची निवड झाल्यानंतर गांगुलीनं ट्वीट करत, भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत जे तीनही प्रकारात खेळू शकतात. एकदिवसीय संघात गिल आणि रहाणे हे दोन खेळाडू नसल्यान आश्चर्य वाटलं. या खेळाडूंना तीनही प्रकारात संधी द्यावी अशी मागणी गांगुलीने केली.

Loading...

वाचा- काश्मीरच्या खतरनाक विक्टर फोर्समध्ये 15 दिवस ट्रेनिंग करणार धोनी!

खेळाडूंमध्ये आत्मविश्वास कायम राखण्यासाठी त्यांना तीनही संघामध्ये घ्यावं असं गांगुलीने म्हटलं आहे. गांगुलीच्या मते, काहीच खेळाडू तीनही प्रकारात खेळत आहेत. बलाढ्य संघांकडे सतत खेळणारे खेळाडू असतात. संघ निवड ही सर्वांना खूश करण्यासाठी नाही तर देशासाठी सर्वोत्कृष्ट संघ निवडणे आणि नेहमी चांगली कामगिरीसाठी असते. वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघावरून अनेकांनी टीका केली आहे. संघात शुभमन गिलला संधी न दिल्यानं दिग्गजांच्या भुवया उंचावल्या आहेत. गिल सध्या फॉर्ममध्ये असून त्याने वेस्ट इंडीज ए विरुद्ध इंडिया ए संघातून खेळताना सर्वाधिक 218 धावा केल्या आहेत.

वाचा- कॅप्टन कोहलीमुळं रवी शास्त्री पॉवरफुल, प्रशिक्षक पदी राहणार कायम?

दरम्यान गांगुलीच्या मताशी सहमत नसल्याचे विनोद कांबळीनं ट्वीट करत, संघासाठी जे खेळाडू सर्वोत्तम आहे. त्यांची निवड झाली आहे. तिन्ही फॉरमॅटसाठी तीन प्रकारचे खेळाडू हवेत जसे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. रहाणेला केवळ कसोटी संघात घेण्यात आले आहे, त्यामुळे चाहत्यांनी त्याला एकदिवसीय संघात स्थान द्यावे अशी मागणी केली होती.

वाचा-निवृत्तीनंतर पहिल्यांदाच मैदानात उतरणार युवराज सिंग, येथे पाहू शकता सामना

असा असेल वेस्ट इंडिज दौरा

भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर 3 ऑगस्टपासून जाणार आहे. यात तीन टी 20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळले जातील. दौऱ्याची सुरुवात टी 20 मालिकेपासून होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका 8 ऑगस्ट तर कसोटी मालिका 22 ऑगस्टला सुरू होणार आहे.

IND vs WI : टीम इंडियात हार्दिक पांड्याची कमी पूर्ण करणार 'हे' तीन अष्टपैलू खेळाडू

ए वतन वतन मेरे, आबाद रहे तू... गायक पोलिसाचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 05:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...