नवी दिल्ली, 25 जुलै : वर्ल्ड कपमध्ये पराभवाचा धक्का सहन करावा लागल्यानंतर निवड समितीनं भारतीय संघात मोठे बदल केले. यातच आता भारतीय संघाचा हेड कोच आणि स्टाफ यांच्या बदल्या करण्याच्या तयारीत बीसीसीआय आहे. दरम्यान, रवी शास्त्री यांना हटवण्यासाठी बीसीसीआयनं नव्या प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले होते. मात्र आता, भारतीय संघातील एका खेळाडूमुळं बीसीसीआय रवी शास्त्री यांच्याकडेच प्रशिक्षक पद ठेवणार आहे. आयएएनएसनं दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी शास्त्री आणि कोहली या दोघांचेही पद कायम ठेवण्यात येणार आहे. कारण 2020च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराटचे नेतृत्व भारतासाठी महत्त्वाचे असेल. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी, “सध्या काही बदल होतील असे वाटत नाही. शास्त्री आणि कोहली दोघंही एकमेकांना पुरक आहेत”, असे सांगितले. तसेच, नवे प्रशिक्षक आल्यास खेळाडूंना नव्यानं सगळ्याची सुरुवात करावी लागले. टी-20 वर्ल्ड कपसाठी केवळ वर्षाचा कालावधी उरला आहे. त्यामुळं नवीन कोच संघाचे समीकरण बदलू शकतात. त्यामुळं रवी शास्त्रींना प्रशिक्षक पदी कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. रवी शास्त्रींचा करार वाढवला वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकांसह सपोर्टींग स्टाफसाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा करार वेस्ट इंडीज दौऱ्यापर्यंत वाढवण्यात आला आहे. बीसीसीआयनं मुख्य प्रशिक्षकांसह इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ज्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत त्यामध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, स्ट्रेंथ अॅण्ड कंडीशनिंग कोच, प्रशासकिय व्यवस्थापक या पदांचा समावेश आहे.यासाठी अर्ज कऱण्याची शेवटची तारीख 30 जुलै आहे. व्यवस्थापक वगळता सर्वांसाठी दोन वर्षांचा कार्यकाळ असणार आहे. प्रशिक्षकाच्या अटी बीसीसीआयने तीन महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. प्रमुख प्रशिक्षकाचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असावे तसेच किमान 2 वर्षांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असायला हवा. मुख्य प्रशिक्षकाकडे कसोटी खेळणाऱ्या देशाला दोन वर्ष प्रशिक्षण दिल्याचा अनुभव असायला हवा किंवा असोसिएट सदस्य, ए टीम, आयपीएल टीम यापैकी एकाला कमीत कमी तीन वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव असायला हवा. भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी महत्त्वाची अट ही असणार आहे की, त्याने किमान 30 आंतरराष्ट्रीय कसोटी किंवा 50 एकदिवसीय खेळलेले असावे. ऑन ड्युटी टिक टॉक VIDEO करणं महिला पोलिसांच्या अंगलट, निष्काळजीपणा भोवला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







