World Cup : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताला दुसरा धक्का, अष्टपैलू खेळाडू वर्ल्ड कप बाहेर

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरोधात पहिल्याच चेंडूत विकेट घेण्याचा पराक्रम विजय शंकरनं केला होता.

News18 Lokmat | Updated On: Jul 1, 2019 05:18 PM IST

World Cup : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताला दुसरा धक्का, अष्टपैलू खेळाडू वर्ल्ड कप बाहेर

लंडन, 01 जुलै : ICC Cricket Worldमध्ये भारताला इंग्लंडनं पराभूत करून मोठा पहिला धक्का दिला. भारतानं वर्ल्ड कपमध्ये एकही सामना गमावला नव्हता, मात्र इंग्लंडनं भारताच्या विजयी रथाला ब्रेक लावला. इंग्लंडनं दिलेल्या 337 धावांचा डोंगर भारताला पार करता आला नाही. भारतानं 31 धावांनी सामना गमावला. या सामन्यात अष्टपैलू विजय शंकरच्या जागी ऋषभ पंतला संधी देण्यातआली होती.

इंग्लंलविरुद्धच्या सामन्यात विजय शंकरच्या टाचेला दुखापत झाल्यामुळं त्याला विश्रांती दिली. मात्र, आता विजय शंकर वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार असल्याचे वृत्त पीटीआयनं दिले आहे. त्यामुळं आता शंकरच्या जागी मयंक अग्रवलला संघात स्थान देण्यात येणार आहे. याआधी भारताचा सलामीवीर शिखर धवन अंगठ्याच्या दुखापतीमुळं वर्ल्ड कप बाहेर पडला होता. धवनच्या जागी ऋषभ पंतला संधी देण्यात आली होती. विजय शंकरनं गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटीमध्ये भारताकडून पदार्पण केले होते. कर्नाटकडून प्रथम श्रेणीमध्ये गाजवल्यानंतर शंकरची वर्ल्ड कप संघात निवड करण्यात आली होती. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरोधात पहिल्याच चेंडूत विकेट घेण्याचा पराक्रम विजय शंकरनं केला होता.

बीसीसीआयच्या प्रमुखांनी पीटीआयला, "विजय शंकरला सराव करताना जसप्रीत बुमराहचा चेंडू पायाला लागला होता. त्यामुळं सध्या तो खेळण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळं वर्ल्ड कपमधून तो बाहेर पडत आहे", अशी माहिती दिली. विजय शंकरच्या जागी कर्नाटकचा खेळाडू मयंक अग्रवालला संधी मिळाली आहे. विजय शंकरनं पाकिस्तान विरोधात वर्ल्ड कपमध्ये पदार्पण केले होते. पाकिस्तान विरोधात त्यानं 15 धावांची खेळी केली होती. तर अफगाणिस्तान विरोधात 29 धावांची खेळी केली होती. वेस्ट इंडिज विरोधात शंकर शेवटचा सामना खेळला होता. त्यानं 14 धावांची खेळी केली होती.

Loading...

विजय शंकरची खेळी

विजय शंकर हा तमिळनाडूचा खेळाडू असून रणजी सामन्यात त्यानं स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. विजय शंकर सगळ्या प्रथम श्रेणीतील सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी करणारा एकमेव फलंदाज होता. त्याच्या या खेळीमुळेच विजयची वर्णी विश्वचषक संघात झाली असावी. त्याने केवळ 9 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तर तेवढेच टी-20 सामने खेळले आहेत.

वाचा- 'तुम्हाला ऋषभ पंत हवा होता ना, घ्या मग'; रोहितनं केली बोलती बंद

वाचा- World Cup: विराट कोहलीने रचला इतिहास; अर्धशतकी खेळीने कर्णधारांमध्ये झाला बाप!

वाचा- World Cup : पहिल्या 20 ओव्हरमध्येच हरला होता भारत, हा घ्या पुरावा

पावसाचा अंदाज ते World Cup अपडेट, या आणि अन्य महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 1, 2019 02:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...