World Cup: विराट कोहलीने रचला इतिहास; अर्धशतकी खेळीने कर्णधारांमध्ये झाला बाप! cricket | virat kohli| ICC world cup

World Cup: विराट कोहलीने रचला इतिहास; अर्धशतकी खेळीने कर्णधारांमध्ये झाला बाप! cricket | virat kohli| ICC world cup

इंग्लंडविरुद्ध भारताचा पराभव झाला असला तरी कर्णधार विराट कोहलीने एक विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे.

  • Share this:

बर्मिंगहॅम, 1 जुलै: ICC Cricket World Cupमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा 31 धावांनी पराभव झाला. वर्ल्ड कपमधील भारताचा हा पहिलाच पराभव आहे. या सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी कर्णधार विराट कोहलीने एक विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात सलग 5 अर्धशतक करणारा विराट जगातील पहिला कर्णधार ठरला आहे. तर दुसरा फलंदाज होय.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विराटने 59 अर्धशतक पूर्ण केले. विराटने या खेळीत 6 चौकार मारले. विराटने त्याच्या या खेळीत 76 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 66 धावांची खेळी केली. विराट पुन्हा एकदा भारताला विजय मिळून देणार असे वाटत असतानाच प्लंकेटने त्याला बाद केले. पण विराटच्या या खेळीत एका विक्रमाची नोंद झाली आहे. वर्ल्ड कपमध्ये सलग 5 सामन्यात 50 हून अधिक धावा करण्याची कामगिरी विराटच्या नावावर जमा झाली आहे. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच याच्या नावावर होता.

World Cup Point Table : भारताचा पराभव, सेमीफायनलमध्ये कोण पोहचणार?

फिंचने याच वर्ल्ड कपमध्ये 4 सामन्यात 50हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. कर्णधार वगळता फलंदाजांचा विचार केल्यास अशी कामगिरी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ याच्या नावावर आहे. त्याने 2015च्या स्पर्धेत 5 सामन्यात 5 वेळा 50हून अधिक धावा केल्या होत्या.

इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात जरी भारताचा पराभव झाला असला तरी विराटने एक विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. भारताविरुद्ध इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी 50 षटकात 7 बाद 336 धावा केल्या. पण भारताला विजयाचे लक्ष्य गाठता आले नाही. भारतीय संघाने 50 षटकात 5 बाद 306 धावा केल्या. 1992च्या वर्ल्ड कपनंतर इंग्लंडने प्रथमच भारताचा पराभव केला आहे.

World Cup : भारताच्या पराभवाला या 11 गोष्टी ठरल्या कारणीभूत!

अर्धशतक झाले पण...

विराटने वर्ल्ड कपमध्ये सलग 5 अर्धशतक करण्याचा विक्रम केला. पण विराटच्या करिअरमध्ये असे प्रथमच झाले की या 5 डावात त्याला शतक करता आले नाही. विराटला या पाच सामन्यात केलेल्या एकाही अर्धशतकाला शतकात रुपांतर करता आले नाही.

आमदाराच्या भावाने महिला अधिकाऱ्याची केली बेदम मारहाण...

First published: July 1, 2019, 9:42 AM IST

ताज्या बातम्या