World Cup : पहिल्या 20 ओव्हरमध्येच हरला होता भारत, हा घ्या पुरावा

World Cup : पहिल्या 20 ओव्हरमध्येच हरला होता भारत, हा घ्या पुरावा

सलग पाच सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताच्या विजयरथाला इंग्लंडने ब्रेक लावला आहे.

  • Share this:

बर्मिंगहम, 1 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये सलग पाच सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताच्या विजयरथाला इंग्लंडने ब्रेक लावला आहे. या पराभवाने भारताचा सेमीफायनल प्रवेश लांबला आहे. 7 पैकी 5 सामने जिंकून भारताने 11 गुणांसह गुणतक्त्यात दुसरे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करणाऱ्या भारताला इंग्लंडविरुद्ध मात्र पराभव पत्करावा लागला. स्पर्धेत आतपर्यंत एकही सामना न गमावलेल्या भारताला इंग्लंडने पराभूत करून सेमीफायनलच्या दिशेन एक पाऊल टाकलं आहे.

इंग्लंडनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जेसॉन रॉय आणि बेअरस्टो यांनी शतकी भागिदारी करत भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. इंग्लंडनं भारतासमोर तब्बल 337 धावांचे बलाढ्या आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं 5 विकेट गमवत 306 धावा केल्या. यात इंग्लंडनं तब्बल 13 षटकारांचा वर्षाव केला. मात्र, भारताला आपल्या 50 ओव्हरमध्ये केवळ एक षटकार मारता आला. शेवटच्य ओव्हरमध्ये महेंद्रसिंग धोनीनं हा षटकार मारला. तर, इंग्लंजकडून बेअरस्टोनं 6, स्टोक्सनं 3 तर, जेसन रॉय आणि बटरल यांनी 2-2 षटकार लगावले.

पहिल्या 20 ओव्हरमध्ये इंग्लंडनं लगावले 8 षटकार

इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करत असताना आक्रमकरित्या भारतीय गोलंदाजांची शाळा घेतली. बेअरस्टो 111 धावा करत बाद झाला. मुख्य म्हणजे बेअरस्टोनं आणि रॉय यांनी 20 ओव्हरमध्ये 8 षटकार लगावले. एकवेळ अशी होती जेव्हा इंग्लंड 380 पर्यंत मजल मारेल असे वाटत असताना शमीनं 5 विकेट घेत, सामना पलटवला.

वेगवान गोलंदाजांनी राखलं, फिरकीपटूंनी उधळलं

गोलंदाजीत भारताकडून एकट्या शमीने यजमानांचा निम्मा संघ तंबूत धाडला. तर बुमराह आणि कुलदीप यादवने एक बळी घेतला. शमी आणि बुमराह वगळता इतर गोलंदाजांची कामगिरी सुमार राहिली. युझवेंद्र चहल आतापर्यंत वर्ल्ड कपमधील भारताचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 10 षटकांत तब्बल 88 धावांची खैरात केली. त्याच्याशिवाय कुलदीप यादवनेसुद्धा 72 धावा दिल्या.

जेसन रॉयचं जीवदान महागात

जेसन रॉय 21 धावांवर असताना डीआरएस न घेण्याचा निर्णय भारताला महागात पडला. जेसन रॉय तेव्हा बाद झाला असता तर कदाचित इंग्लंडवर दबाव टाकण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी झाले असते.

शेवटच्या ओव्हरमध्ये इंग्लंडचे वादळ तर भारत शांत

इंग्लंडनं आपल्या शेवटच्या 20 ओव्हरमध्ये 92 धावा केल्या. दरम्यान त्यांनी 4 विकेटही गमावल्या. तर, भारतानं आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या 10 ओव्हरमध्ये 63 धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये जॉस बटलरनं आक्रमक फलंदाजी करत 5 षटकार लगावले. मात्र, भारताकडून महेंद्रसिंग धोनीनं केवळ 1 षटकार लगावला. धोनी आणि पांड्या आक्रमक फलंदाजी करत असतानाच पांड्यांच्या विकेटनंतर भाराताच्या हातातून सामना निसटला.

पावसाचा अंदाज ते World Cup अपडेट, या आणि अन्य महत्त्वाच्या बातम्या

First published: July 1, 2019, 9:40 AM IST

ताज्या बातम्या