जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / पदार्पणानंतर 12 वर्षांनी टीम इंडियात खेळणार गोलंदाज, BCCIने दिली संधी

पदार्पणानंतर 12 वर्षांनी टीम इंडियात खेळणार गोलंदाज, BCCIने दिली संधी

पदार्पणानंतर 12 वर्षांनी टीम इंडियात खेळणार गोलंदाज, BCCIने दिली संधी

भारताच्या कसोटी संघात पदार्पण केल्यानंतर फक्त एक सामना खेळण्याची संधी मिळालेल्या गोलंदाजाला आता १२ वर्षांनी बांगलादेश दौऱ्यासाठी वर्णी लागली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 डिसेंबर : बांगलादेश विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज जयदेव उनादकट याचा समावेश करण्यात आला आहे. तब्बल 12 वर्षांनी उनादकटला भारताच्या कसोटी संघात संधी मिळाली आहे. आतापर्यंत केवळ एकच कसोटी तो खेळला आहे. आता मोहम्मद शमीच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे जयदेव उनादकटची कसोटी संघात वर्णी लागलीय. जयदेव उनादकटला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या जागी संघात घेण्यात आलं आहे. दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून शमी बाहेर पडला होता. सध्या उनादकट राजकोटमध्ये आहे, त्याची विजाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानतंर तो बांगलादेशात रवाना होईल. बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका 14 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. हेही वाचा :  भारताचा बांगलादेशवर दणदणीत विजय, अखेरचा सामना जिंकून क्लीन स्वीप टाळला जयदेव उनादकटने 2019-20 च्या हंगामात रणजीत 67 विकेट घेतल्या होत्या. त्याच्याच नेतृत्वाखाली सौराष्ट्रने रणजी ट्रॉफी जिंकली. यानतंर विजय हजारे ट्रॉफीत सर्वाधिक 19 विकेट घेतल्या आणि सौराष्ट्रला विजय मिळवून दिला. टीम इंडियाकडून जयदेव उनादकटने एका कसोटीशिवाय सात एकदिवसीय सामने आणि 10 टी20 सामने खेळले आहेत. त्याने मार्च 2019 मध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या निदहास ट्रॉफीमध्ये भारताकडून सामना खेळला होता. हेही वाचा :  विराटने मोडला रिकी पाँटिंगचा विक्रम, सचिननंतर अशी कामगिरी करणारा दुसरा जयदेव उनादकटला कसोटी मालिकेत खेळण्याची संधी मिळाल्यास मोठ्या गॅपनंतर कसोटी खेळण्याचा विक्रम करू शकतो. सध्या हा विक्रम भारताचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेलने 8 वर्षानंतर कसोटीमध्ये पुनरागमन केलं होतं. आता उनादकट 12 वर्षांनी कसोटी संघात पुनरागमन करणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात