जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / विराट कोहली नव्हे तर 'या' खास व्यक्तींसोबत अनुष्काची ब्रेकफास्ट डेट; समोर आले फोटो

विराट कोहली नव्हे तर 'या' खास व्यक्तींसोबत अनुष्काची ब्रेकफास्ट डेट; समोर आले फोटो

विराट कोहली नव्हे तर 'या' खास व्यक्तींसोबत अनुष्काची ब्रेकफास्ट डेट; समोर आले फोटो

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा बऱ्याच दिवसांनी ‘चकदा एक्सप्रेस’च्या माध्यमातून चित्रपटात दिसणार आहे. क्रिकेटवर आधारित या चित्रपटासाठी अभिनेत्री खूप मेहनत घेत आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 7 सप्टेंबर-  बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा बऱ्याच दिवसांनी ‘चकदा एक्सप्रेस’च्या माध्यमातून चित्रपटात दिसणार आहे. क्रिकेटवर आधारित या चित्रपटासाठी अभिनेत्री खूप मेहनत घेत आहे. अनुष्काचा पती आणि क्रिकेटर विराट कोहली चित्रपटासाठी क्रिकेटमधील बारकावे शिकवण्यास मदत करत आहे. अनुष्का तिच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या तयारीची झलक दाखवत असते. दरम्यान आता अनुष्का एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अनुष्का शर्मा सध्या लंडनमध्ये कुटुंबासोबत व्हेकेशनचा आनंद घेत आहे. नुकतंच अनुष्काने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर, वडील अजय शर्मा आणि आई आशिमा शर्मा यांच्यासोबत नाश्ता करतानाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ते ‘हॅरोगेट नॉर्थ यॉर्कशायर’ याठिकाणी दिसून येत आहेत . अनुष्काने एक सेल्फी घेतला आहे ज्यामध्ये ती आपल्या आई-वडिलांसोबत खूप आनंदी दिसत आहे. याशिवाय ब्रेकफास्टमध्ये कॉफी, ब्रेड आणि इतर स्नॅक्स दिसून येत आहेत. शिवाय अनुष्काने भिंतीवरील काही सुंदर कलाकृतींची झलकही दाखवली आहे. अभिनेत्रीने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलंय, ‘ब्रेकफास्ट डेट विथ द पेरेंट्स’. अनुष्का शर्माची या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रेटी लाईक्स आणि कमेंट्सहा वर्षाव करत आहेत. काहींनी कमेंट करत क्युट फॅमिली म्हटलं आहे. तर काहींनी अनुष्काला तिच्या आईसारखीच दिसत असल्याचं म्हटलं आहे.तर काही चाहत्यांनी अनुष्का आणि विराट कोहलीची मुलगी वामिकाची झलक दाखवण्याची मागणी केली आहे. एका युजरने लिहलंय, “वामिका कुठे आहे?” एकाने ‘ग्रेट फोटो.. तुझ्या पालकांना प्रेम दे’ असं लिहलंय. तर अनेकांनी अनुष्काच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

जाहिरात

**(हे वाचा:** Pushpa 2: रश्मिका मंदानाने ‘पुष्पा 2’बाबत दिली मोठी अपडेट; शूटिंगबाबत म्हणाली… ) अनुष्का शर्माचे वडील एक निवृत्त आर्मी ऑफिसर आहेत. तर अभिनेत्रीची आई गृहिणी आहे. अनुष्काच्या व्यावसायिक आयुष्याबाबत सांगायचं तर, अनुष्का शर्माचा पती विराट कोहलीने दिग्गज गायक आणि अभिनेता किशोर कुमार यांचा मुंबईतील बंगला भाड्याने घेतला आहे. तिथे विराट एक रेस्टॉरंट उघडणार आहे.इतकंच नव्हे तर अनुष्का आणि विराटने अलिबागमध्ये 8 एकर केल्याचं सांगण्यात आलं होतं. याठिकाणी हे सेलिब्रेटी कपल फार्महाउस उभारणार असल्याचं म्हटलं जात आहे..

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात