Home /News /sport /

Sachin Tendulkar Health Update : सचिन तेंडुलकर हॉस्पिटलमध्ये दाखल, 5 दिवसांपूर्वी झाला होता कोरोना

Sachin Tendulkar Health Update : सचिन तेंडुलकर हॉस्पिटलमध्ये दाखल, 5 दिवसांपूर्वी झाला होता कोरोना

भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल (Sachin Tendulkar hospitalised) झाला आहे. याबाबत स्वत: सचिननेच सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.

    मुंबई, 2 एप्रिल : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या तब्येती बाबत मोठी बातमी आहे. सचिन तेंडुलकरला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. आता त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सचिननं स्वत: ट्विटरवर ही माहिती दिली आहे. 'तुमच्या शुभेच्छा आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद. वैद्यकीय सल्ल्यानुसार मी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. लवकरच बरा होऊन मी घरी परतेल, अशी आशा आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. सर्व भारतीय आणि माझ्या टीममधील सहकाऱ्यांना वर्ल्ड कप विजेतेपदाच्या दशकपूर्तीच्या शुभेच्छा ' असं ट्वीट सचिनने केलं आहे. Thank you for your wishes and prayers. As a matter of abundant precaution under medical advice, I have been hospitalised. I hope to be back home in a few days. Take care and stay safe everyone. Wishing all Indians & my teammates on the 10th anniversary of our World Cup 🇮🇳 win. — Sachin Tendulkar (@sachin_rt) April 2, 2021 दरम्यान, सचिन तेंडुलकरला मागच्या आठवड्यात  कोरोनाची लागण झाली होती. सचिननं स्वत: ट्विटरवर ही माहिती सर्वांना दिली.  'माझ्यामध्ये आढळून आलेली लक्षणं सौम्य स्वरुपातील आहेत. कुटुंबीयांचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे,' असंही त्याने सांगितले होते. ( वाचा :  सचिन तेंडुलकरला कोरोना, शोएब अख्तर म्हणतो... ) सचिननं यापूर्वी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होतं की, 'कोरोना दूर ठेवण्यासाठी मी योग्य खबरदारी घेत होतो आणि चाचणी देखील करत होतो. मात्र तरीदेखील सौम्य लक्षण आढळून मी पॉझिटिव्ह आढळलो आहे. घरातील इतर सदस्य कोरोना निगेटिव्ह आहेत. मी स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतलं आहे आणि माझ्या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी आवश्यक प्रोटोकॉल्सचे पालन देखील करत आहे. मी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानतो जे मला आणि देशातील इतरांना पाठिंबा देत आहेत. सर्वांनी काळजी घ्या.'
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Sachin tendulkar, Sachin Tendulkar (Cricket Player)

    पुढील बातम्या