जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / सेमीफायनलमध्ये पाकविरुद्ध यशस्वीचे शतक, मुंबईत वडिलांना दिलेलं वचन आफ्रिकेत केलं पूर्ण

सेमीफायनलमध्ये पाकविरुद्ध यशस्वीचे शतक, मुंबईत वडिलांना दिलेलं वचन आफ्रिकेत केलं पूर्ण

सेमीफायनलमध्ये पाकविरुद्ध यशस्वीचे शतक, मुंबईत वडिलांना दिलेलं वचन आफ्रिकेत केलं पूर्ण

अंडर 19 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडनं दणदणीत विजय मिळवला. नाबाद शतकी खेळी करणारा यशस्वी जयस्वाल ठरला विजयाचा शिल्पकार.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 04 फेब्रुवारी : अंडर 19 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडनं दणदणीत विजय मिळवला. यामध्ये भारताच्या यशस्वी जयस्वालने नाबद शतकी खेळी केली. त्याने षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला. यासह त्याने भारताला फायनलमध्येही पोहोचवलं आणि वडिलांचं स्वप्नही पूर्ण केलं. पाकिस्तानने दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या शतकाच्या आणि दिव्यांश सक्सेनाच्या अर्धशतकाच्या जोरावर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. जयस्वाल आणि दिव्यांश सक्सेना यांनी पाकच्या गोलंदाजांना एकही संधी दिली नाही. दोघांनी सावधपणे खेळ करत भारताचा विजय साजरा केला. जयस्वालने नाबाद 105 तर दिव्यांशने नाबाद 59 धावा केल्या. भारताला विजयासाठी 5 धावांची गरज असताना दिव्यांश फलंदाजीला तर जयस्वाल नॉन स्ट्राइकला होता. तेव्हा वाइड चेंडूवर चोरटी धाव घेतल दोघांनी स्ट्राइक बदलला. त्यानतंर भारताला 3 धावा हव्या होत्या. यशस्वी जयस्वालने 99 धावांवर खेळत असताना एक षटकार मारून विजय आणि शतक दोन्ही साजरे केले. यशस्वीने 113 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 106 धावा केल्या. पाणीपुरी विक्रेता ते शतकवीर मॅचविनर : एकाच वर्षात बदललं ‘यशस्वी’ आयुष्य सेमीफायनलमध्ये यशस्वीने शतक करून त्याच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. यशस्वी जयस्वालचे वडील भूपेंद्र यांनी पाकिस्तानविरुद्ध शतक करावं अशी इच्छा यशस्वीकडे व्यक्त केली होती. यशस्वीने तो शब्द पाळत पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिलाच पण वडिलांची इच्छाही पूर्ण केली. पाकच्या हैदरला चेंडू लागताच धावला भारतीय खेळाडू, फोटो पाहून कराल सॅल्यूट!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cricket
  • First Published :
जाहिरात
जाहिरात