पॉचेफस्ट्रूम, 04 फेब्रुवारी : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानला 172 धावांत गुंडाळले. भारताच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या फंलदाजांनी शरणागती पत्करली. रोहेल नझीर, हैदर अली, मोहम्मद हॅरीस यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. या सामन्यात भारताच्या सुशांत मिश्राने पाकला पहिला दणका दिला. दरम्यान, सुशांत मिश्राच्या गोलंदाजीवर उसळता चेंडू हैदर अलीच्या खांद्याला जोरात लागला. यामुळे हैदर खाली पडला. तेव्हा सुशांतने त्याच्याजवळ जाऊन विचारपूस केली. याचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक चाहते करत आहेत.
हैदर अलीला चेंडू लागल्यानंतर तो खाली पडला. त्यानंतर पाकिस्तान संघाचे फिजिओ मैदानात आले. त्यांच्या सल्ल्यानंतर अलीने फलंदाजी केली. त्याने 77 चेंडूत 56 धावा काढल्या.
Mishra bowls a short delivery that hits Haider Ali's left shoulder.. #SpiritOfCricket#INDvsPAK #PAKvIND pic.twitter.com/mWHBEWDrE8
— SKY (@yourvkkk) February 4, 2020
पाकिस्तानच्या संघाला 50 षटकेही खेळून काढता आली नाहीत. भारताच्या भेदक माऱ्यासमोर पाकचा संघ 43.1 षटकात 172 धावांपर्यंत मजल मारू शकला. रोहेल नझीर 62 धावा, हैदर अली 56 धावा आणि मोहम्मद हॅरीस 21 धावा वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. भारताच्या सुशांत मिश्राने 28 धावा देत सर्वाधिक तीन गडी बाद केले. त्यानंतर कार्तिक त्यागी आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन तर अंकोलेकर आणि जयस्वालने प्रत्येकी एक गडी बाद केला. सहकाऱ्याला बाद करण्यासाठी धावणारे वर्ल्ड कप जिंकायला निघालेत, पाकचे खेळाडू ट्रोल

)







