लाहोर, 30 सप्टेंबर: सध्या पाकिस्तानचा संघ इंग्लंडविरुद्ध मायदेशात टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेत आतापर्यंत सहा सामने झाले असून एक सामना बाकी आहे. सहापैकी 3 सामने पाकिस्ताननं तर तीन सामने इंग्लंडनं जिंकले आहेत. आज लाहोरमध्ये झालेला सहावा टी20 सामना 8 विकेट्सनी जिंकून इंग्लंडनं मालिकेत बरोबरी साधली. पण या सामन्यादरम्यान पाकिस्तानचे अम्पायर अलिम डार यांना मात्र चांगलाच फटका बसला. आणि भर मैदानात त्यांना आपला पाय चोळत बसावा लागला. हैदर अलीकडून अलीम डार टार्गेट पाकिस्तानच्या डावात सहाव्या ओव्हरमध्ये कॅप्टन बाबर आझम आणि हैदर अली बॅटिंग करत होते. पण याच ओव्हरच्या पाचव्या बॉलवर हैदर अलीनं पूलचा फटका खेळला. पण हैदर अलीचा हा फटका स्क्वेअर लेगवर असलेल्या अलीम दार यांना चुकवता आला नाही. आणि बॉल थेट दार यांच्या पायावर लागला. त्यावेळी अलिम दार थोडा वेळ कळवळले आणि मैदानातच पाय चोळताना दिसले. दरम्यान हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Yikes 😵💫pic.twitter.com/c3XaH10c1Z
— Cricbuzz (@cricbuzz) September 30, 2022
बाबरचं नाबाद अर्धशतक, सॉल्टची तुफानी खेळी इंग्लंड आणि पाकिस्तान संघातल्या या सामन्यात दोन्ही बाजूनं तुफान फटकेबाजी झाली. पाकिस्तानच्या डावात कॅप्टन बाबर आझमनं 59 बॉलमध्ये 7 फोर आणि 3 सिक्ससह नाबाद 87 धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 6 बाद 169 धावा करता आल्या. पण 170 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडनं सुरुवातीलाच पाकिस्तानी बॉलर्सवर हल्ला केला. हेही वाचा - MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीची नवी इनिंग? पण क्रिकेटच्या मैदानात नाही, तर… सलामीच्या फिल सॉल्टच्या आक्रमक खेळीच्या जोरावर इंग्लंडनं पॉवर प्लेच्या 6 ओव्हर्समध्येच तब्बल 82 धावा चोपल्या. सॉल्टनं अवघ्या 19 बॉल्समध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. इंग्लिश फलंदाजानं ठोकलेलं हे तिसरं सर्वात जलद अर्धशतक ठरलं. त्यानंतर सॉल्टनं 41 बॉल्समध्ये 13 फोर आणि 3 सिक्ससह नाबाद 88 धावा करुन इंग्लंडला हा सामना एकहाती जिंकून दिला. 170 धावांचं विजयी लक्ष्य इंग्लंडनं 14.3 ओव्हरमध्येच पार केलं. दरम्यान या मालिकेतला एकमेव सामना 2 ऑक्टोबरला होणार आहे. दोन्ही संघांनी 3-3 सामने जिंकल्यानं रविवारी होणारा सामना निर्णयाक ठरणार आहे.