क्रिकेटपटूने लाज सोडली! फिटनेस टेस्ट नापास झाल्याने काढले सगळे कपडे

क्रिकेटपटूने लाज सोडली! फिटनेस टेस्ट नापास झाल्याने काढले सगळे कपडे

पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमल त्याच्या फिटनेस टेस्ट वेळी केलेल्या कृतीमुळे वादात अडकला आहे.

  • Share this:

कराची, 03 फेब्रुवारी : क्रिकेटच्या संघात स्थान टिकवायचे असेल तर प्रत्येक खेळाडूला फिटनेस महत्वाचा असतो. क्रिकेट खेळणारे सर्वच देश खेळाडूंची फिटनेस टेस्ट घेतात. काही देश योयो टेस्टही घेतात. यात पास होणाऱ्यांचाच समावेश संघात केला जातो. इथं तुमच्या कामगिरीपेक्षा कधी कधी फिटनेस सरस ठरू शकतो. आता पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमल त्याच्या फिटनेस टेस्ट वेळी केलेल्या कृतीमुळे वादात अडकला आहे. फिटनेस नसल्यानं त्याचा संघात समावेश होत नसल्याचं सांगितलं जात आहे.

पाकिस्तानच्या नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीमध्ये सुरु असलेल्या फिटनेस टेस्टमध्ये उमर अकल फेल झाला. त्यानतंर त्याने ट्रेनरसमोरच सगळे कपडे काढले. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार ज्यावेळी त्याच्या शरीराच्या फॅटची चाचणी केली त्यात तो फेल झाला. त्यानंतर रागाच्या भरात अकमलने त्याचे सगळे कपडे उतरवले.

उमर अकमलने सगळे कपडे उतरवून ट्रेनरला विचारलं की, कुठं आहे फॅट? या घटनेनंतर पीसीबीकडे उमर अकमलची तक्रार करण्यात आली आहे. यामुळे उमर अकमलवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. याआधी त्याला 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीवेळी इंग्लंडमधून घरी पाठवण्यात आळा होता. तेव्हा फिटनेस टेस्टमध्ये फेल झाल्याने प्रशिक्षक मिकी ऑर्थर यांनी कारवाई केली होती.

वाचा : फलंदाज, यष्टीरक्षक, कर्णधार! भारताच्या संकटमोचकानं 14 दिवस घेतलं होतं कोंडून

नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीत झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये उमर अकमलशिवाय कामरान अकमल आणि सलमान बट्ट हे दोघेही फेल झाले. यात सलमान बट्ट अर्धवट फिटनेस टेस्ट सोडून गेला. त्यामुळे पीसीबी त्याच्यावर कारवाई करू शकते. त्याने फिटनेस टेस्ट पुढे ढकलण्याची मागणी केली होती. ती मागणी एनसीएने फेटाळली होती. कामरान अकमलनेसुद्धा दोनवेळा फिटनेस टेस्ट अर्धवट सोडली होती.

न्यूझीलंडचे खेळाडू चेहऱ्यावर गुलाबी रंग लावून खेळले, कारण वाचून कौतुक कराल

First published: February 3, 2020, 2:08 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या