माउंट मोंगानुई, 02 फेब्रुवारी : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने न्यूझीलंडमध्ये पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला. रविवारी झालेल्या मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने 7 धावांनी विजय मिळवला. तसेच 5-0 ने टी20 मालिका जिंकणारा भारत पहिलाच देश ठरला आहे. भारताने पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये टी20 मालिका जिंकण्याची कामगिरीही केली.
न्यूझीलंडसाठी पाचवा सामना खास आणि महत्त्वाचाही होता. मात्र, यात त्यांना विजय मिळवता आला नाही. रॉस टेलरचा हा 100 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना होता. यात रॉस टेलरने अर्धशतकी खेळी केली. याशिवाय आणखी एका कारणाने न्यूझीलंडसाठी हा सामना खास होता. खेळाडू त्यासाठी गुलाबी रंग लावून मैदानात उतरले होते. यातून न्यूझींलडच्या खेळाडूंनी खास संदेश दिला होता. याच महिन्याच्या अखेरीस 21 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियामध्ये महिला टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. या वर्ल्ड कपच्या आधी न्यूझीलंडच्या पुरुष संघाने त्यांच्या महिला संघाच्या समर्थनार्थ गुलाबी रंग चेहऱ्याला लावला होता.
12 overs into the Indian batting innings at Bay Oval. India 101/2 Bennett dismissing Rahul for 45 in the 12th. Pink zinc on in support of the @WHITE_FERNS ahead of the @T20WorldCup. LIVE scoring | https://t.co/C9zslxZiaE #NZvIND pic.twitter.com/0bK6ixinhR
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 2, 2020
रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याआधी याच मैदानावर न्यूझीलंडच्या महिला संघाचा आणि दक्षिण आफ्रिका यांची लढत झाली होती. यात न्यूझीलंडने 9 गडी राखून विजय मिळवला होता. यामध्ये सोफी डिव्हाइनने नाबाद अर्धशतकी खेळी केली होती.
वाचा : केएल राहुलची न्यूझीलंडविरुद्ध कमाल, विराट कोहलीला टाकलं मागे
महिला टी20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड आणि भारत एकाच ग्रुपमध्ये आहेत. या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगलादेश यांचाही समावेश आहे. वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडच्या संघाचा 22 फेब्रुवारीला लंकेविरुद्ध सामना होणार आहे. तर भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना होईल.
वाचा : विराट आणि विल्यम्सनच्या PHOTO चा सोशल मीडियावर धुमाकूळ, कारण माहित आहे का?
वाचा : हा तर षटकारच होता पण सुपरमॅन संजू सॅमसनने केली कमाल, VIDEO एकदा बघाच
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket