जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / राजस्थान रॉयल्सच्या Trent Boult ने 'ड्रीम हॅट्रिक' चा केला खुलासा, निशाण्यावर आहेत 'हे' तीन खेळाडू

राजस्थान रॉयल्सच्या Trent Boult ने 'ड्रीम हॅट्रिक' चा केला खुलासा, निशाण्यावर आहेत 'हे' तीन खेळाडू

Trent Boult

Trent Boult

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रदर्शन कमलीचे पाहायला मिळत आहे. राजस्थानसाठी जोस बटलर रनमशीन बनला आहे तर दुसरीकडे ट्रेंट बोल्ट (Trent Boult ) संधीचे सोने करत विकेट्स गोळा करत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 मे: आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रदर्शन कमलीचे पाहायला मिळत आहे. राजस्थानसाठी जोस बटलर रनमशीन बनला आहे तर दुसरीकडे ट्रेंट बोल्ट (Trent Boult ) संधीचे सोने करत विकेट्स गोळा करत आहे. किवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने या मोसमात चांगलाच खेळ केला. आंतरराष्ट्रीय स्तरावरही बोल्टने फलंदाजांच्या नाकात दम आणला आहे. न्यूझीलंडला पहिल्या कसोटी चॅम्पियनशिपचे पहिले विजेतेपद मिळवून देण्यात बोल्टचे मोठे योगदान आहे. न्यूझीलंडचा संघ टी20 विश्वचषक 2021 मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता, बोल्टनेही संघाला अंतिम फेरीत नेण्यात मोलाचे योगदान दिले होते. एका मुलाखतीत बोल्टला हॅट्ट्रिकबद्दल विचारण्यात आले. जेव्हा त्याला विचारण्यात आले की जर तु आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक घेतली तर तुमच्या 3 ड्रीम विकेट कोणाच्या असतील. या प्रश्नाच्या उत्तरात किवी वेगवान गोलंदाजाने विराट कोहली, टीम सौदी आणि जेम्स नीशमचे नाव घेतले. तो म्हणाला की, टीम सौदीने त्याचा हॅटट्रिक बॉल खेळावा, तो त्याच्यावर प्रेशर बॉल टाकेल. तसेच तो म्हणाला की मी टीम साऊथीशिवाय इतर कोणाचाही दबावाखाली गोलंदाजी करण्याचा विचार करू शकत नाही. याशिवाय बोल्ट म्हणाला की विल्यमसन माझा मित्र आहे, त्यामुळे मी माझ्या मित्राचे नाव देऊ शकत नाही. ज्युनिअर पांड्याला घेऊन गुजराती गाण्यावर थिरकला Rashid Khan, पाहा CUTE VIDEO राजस्थान रॉयल्सचा (RR) कर्णधार संजू सॅमसनच्या कर्णधारपदावर ट्रेंट बोल्ट म्हणाला की, तो खूप स्थिर कर्णधार आहे. सॅमसन हा अतिशय सकारात्मक, प्रभावशाली आणि शांत स्वभावाचा असल्याचेही त्याने सांगितले. तसेच, बोल्टने कोणत्या फलंदाजाला गोलंदाजी करताना त्रास होतो. याचा खुलासाही त्याने यावेळी केला आहे.त्याला करुण नायरला गोलंदाजी करणे अवघड जाते. तो म्हणाला की, आंतरराष्ट्रीय स्तरावर मी करुण नायरविरुद्ध गोलंदाजी केली नाही, तर नेट सत्रात त्याच्याविरुद्ध गोलंदाजी केली आहे. तो पुढे म्हणाला की, करुण नायर नेट सेशनमध्ये माझा चेंडू शानदार खेळतो. त्याला माझा चेंडू खेळताना फारसा त्रास होत नाही. मला वाटते की करुण नायर माझ्याविरुद्ध चांगली फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांपैकी एक आहे. त्याला माझा चेंडू खेळण्यात कोणतीही अडचण येत नाही. तो माझ्या चेंडूवर अगदी सहज फलंदाजी करतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात