नवी दिल्ली, 13 एप्रिल: अनेकदा लाईव्हा मॅचदरम्यान(Live) अनेक भन्नाट गोष्टी घडत असल्याचे पाहिले आहे. उत्साहाच्या भरात चाहते मैदानात उतरतात आणि सामना थांबवण्याची वेळ येते. क्रिकेट (Cricket) सामन्यात अनेकदा प्रेक्षक मैदानात प्रवेश करतात आणि खेळाडूंसोबत फोटो काढण्याचा किंवा त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतात. परदेशात देखील असे चाहते असतात. पण ऑस्ट्रेलियात काही भलतेच पाहायला मिळाले. एका लीग दरम्यान अजब प्रकार घडला. चक्क एक महिला टॉपलेस होऊन मैदानात आली. आणि सर्वत्र एकच खळबळ माजली. हा धक्कादायक प्रकार ऑस्ट्रेलियात रग्बी लीगच्या Gold Coast Titans विरुद्ध Parramatta Eels टीमची मॅच सुरू असताना घडला. रग्बी सामन्यात (rugby match) एक महिला चक्क टॉपलेस होऊन मैदानात घुसली. यामुळे सामना काही काळासाठी थांबवावा लागला. संबंधित महिलेचे नाव जावोन जोहानसन असल्याचे समजते.
तिला मैदानातून बाहेर काढण्यासाठी सुरक्षारक्षकांना खूप मेहनत घ्यावी लागली. त्यांनाही धक्काबुक्की करून ती मैदानात फिरण्याचा प्रयत्न करत होती. मैत्रिणीनं दिलेलं चॅलेंज महिलेन दिलेल्या माहितीनुसार, तिच्या मैत्रिणीनं तिला हे चँलेज दिले होते. आणि ते तिनं स्विकारलं होते. कारण यामध्ये काही विचार करावे असे वाटलं नाही. संधी मिळाली आणि मी चॅलेंज पूर्ण केले असे जावोनने म्हटले आहे.
सोशल मीडियावर वाद जावोनने मैदानात प्रवेश करताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला घेरले आणि मैदानाबाहेर नेले. पण या प्रकारावर आता सोशल मीडियात वाद सुरू झाला आहे. पोलिसांनी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला ज्या पद्धतीने मैदानाबाहेर नेले ती पद्धत चुकीची असल्याचे काहींनी म्हटले आहे. या उटल काहींनी जावोनने जो काही प्रकार केला त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.