टोकयो, 29 ऑगस्ट: टोकयोमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत (Tokyo Paralympics 2020) भारताची टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेल (Bhavinaben Patel) हिनं देशाला पहिलं मेडल मिळवून दिलंय.रविवारी झालेल्या मॅचमध्ये तिनं सिल्व्हर मेडलची कमाई केली. भाविनाचा फायनलमध्ये 3-0 नं पराभव झाला. तिचा वर्ल्ड नंबर वन पॅडलर झाऊ यिंगनं 11-7, 11- 5, 11-6 असा पराभव केला. या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला मिळालेलं हे पहिलंच मेडल आहे.
भाविना पटेलनं पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात सिल्व्हर मेडल पटकावणारी दुसरी भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी 2016 साली दीपा मलिकनं ही कामगिरी केली होती. तिनं गोळाफेक स्पर्धेत 4.61 मीटर थ्रो करत सिल्व्हर मेडल पटकावले होते. यापूर्वी भाविना पटेलनं सेमी फायनलमध्ये चीनच्या वर्ल्ड नंबर 3 खेळाडूला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. भाविनानं सेमी फायनलची लढत 7-11, 11-7, 11-4, 9-11 आणि 11-8 या फरकानं जिंकली होती.
A #Silver medal #IND will remember ❤️
Bhavina Patel's incredible #Paralympics campaign ends with a podium finish as she loses out to #CHN's Zhou Ying 11-7, 11-5, 11-6 in her Class 4 #ParaTableTennis final! 🏆 Thank you for the moments 😃 pic.twitter.com/j8GcnHDtDL — #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) August 29, 2021
भाविनाच्या या ऐतिसिक कामगिरीची पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील प्रशंसा केली आहे. 'भाविना पटेलनं इतिहास रचला आहे. तिनं देशासाठी सिल्व्हर मेडलची कमाई केलीय. त्यासाठी तिचे अभिनंदन. तिचा आजवरचा प्रवास हा अतिशय प्रेरणादायी आहे. त्यामुळे देशातील तरुणांना खेळाकडं वळण्याची प्रेरणा मिळेल.' अशी प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केली आहे.
The remarkable Bhavina Patel has scripted history! She brings home a historic Silver medal. Congratulations to her for it. Her life journey is motivating and will also draw more youngsters towards sports. #Paralympics
— Narendra Modi (@narendramodi) August 29, 2021
गुजरातमधल्या (Gujarat) मेहसाणा जिल्ह्यातलं वडनगर (Vadnagar) हे भाविनाचं गाव. 6 नोव्हेंबर 1986 रोजी तिचा एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. ती अवघ्या एका वर्षाची असताना तिला पोलिओ झाला. तेव्हापासून तिला अपंगत्व आलं. पाच जणांच्या कुटुंबात तिचे वडील एकटेच कमावणारे होते. त्यामुळे तिच्यावर इलाज करण्यासाठी पुरेसे पैसे त्यांच्याकडे नव्हते. नंतरच्या काळात तिच्यावर विशाखापट्टणममध्ये सर्जरी करण्यात आली, मात्र तिचं व्हीलचेअरवर बसणं चुकलं नाही.
तरीही तिने जिद्दीने सगळ्या अडचणींवर मात करत इथपर्यंतची वाटचाल केली आहे. तिने आशियाई खेळांतही पदक जिंकलं आहे. आतापर्यंत तिने 28 आंतरराष्ट्रीय टुर्नामेंट्समध्ये भाग घेतला असून, भारतासाठी तिने आतापर्यंत पाच सुवर्णपदकं, 13 रौप्य आणि कास्यपदकं जिंकली आहेत. 2011-12 मध्ये तिला सरदार पटेल आणि एकलव्य पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Olympics 2021, Sports