• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • Google करू नका इथे वाचा कोण आहे भाविना पटेल; पोलिओने व्हिलचेअरवर बसवलं, पण Tokyo Paralympics मध्ये ऐतिहासिक कामगिरी

Google करू नका इथे वाचा कोण आहे भाविना पटेल; पोलिओने व्हिलचेअरवर बसवलं, पण Tokyo Paralympics मध्ये ऐतिहासिक कामगिरी

आतापर्यंत कोणत्याही भारतीय महिला खेळाडूने ऑलिम्पिक किंवा पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक (Gold Medal) जिंकण्याचा पराक्रम नोंदवलेला नाही. त्यामुळे भाविनाकडे भारताची पहिली सुवर्णकन्या अर्थात गोल्डन गर्ल (Golden Girl) बनण्याची संधी आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : टोकियोत सुरू असलेल्या पॅरालिम्पिक (Tokyo Paralympics) स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेल (Bhavinaben Patel) हिने अंतिम फेरीत पोहोचून इतिहास रचला आहे. सेमी-फायनलमध्ये चीनच्या झेंग मियाओ या खेळाडूला 3-2 ने हरवून भाविनाबेन पटेल हिने फायनलमध्ये प्रवेश केला. 7-11, 11-7, 11-4, 9-11, 11-8 अशा पद्धतीने भाविनाने सेमी-फायनलमध्ये विजय मिळवला. आतापर्यंत कोणत्याही भारतीय महिला खेळाडूने ऑलिम्पिक किंवा पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक (Gold Medal) जिंकण्याचा पराक्रम नोंदवलेला नाही. त्यामुळे भाविनाकडे भारताची पहिली सुवर्णकन्या अर्थात गोल्डन गर्ल (Golden Girl) बनण्याची संधी आहे. 2016 मध्ये झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधूने आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत दीपा मलिकने रौप्यपदक जिंकलं होतं. मात्र या दोन्ही खेळाडूंना अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याआधी क्वार्टर फायनलमध्ये भाविनाने सर्बियाच्या बोरिस्लावा रँकोविच पेरिच हिला सलग तीन गेम्समध्ये 11-5, 11-6, 11-7 असं हरवलं होतं. महिला सिंगल्स क्लास 4 कॅटेगरीमध्ये भाविनाने अंतिम 16 मध्ये ब्राझीलच्या जॉयस डी ओलिव्हिएराला नमवलं होतं. जॉयसने 2016 साली रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं. गुजरातमधल्या (Gujarat) मेहसाणा जिल्ह्यातलं वडनगर (Vadnagar) हे भाविनाचं गाव. 6 नोव्हेंबर 1986 रोजी तिचा एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. ती अवघ्या एका वर्षाची असताना तिला पोलिओ झाला. तेव्हापासून तिला अपंगत्व आलं. पाच जणांच्या कुटुंबात तिचे वडील एकटेच कमावणारे होते. त्यामुळे तिच्यावर इलाज करण्यासाठी पुरेसे पैसे त्यांच्याकडे नव्हते. नंतरच्या काळात तिच्यावर विशाखापट्टणममध्ये सर्जरी करण्यात आली, मात्र तिचं व्हीलचेअरवर बसणं चुकलं नाही. तरीही तिने जिद्दीने सगळ्या अडचणींवर मात करत इथपर्यंतची वाटचाल केली आहे. तिने आशियाई खेळांतही पदक जिंकलं आहे. आतापर्यंत तिने 28 आंतरराष्ट्रीय टुर्नामेंट्समध्ये भाग घेतला असून, भारतासाठी तिने आतापर्यंत पाच सुवर्णपदकं, 13 रौप्य आणि कास्यपदकं जिंकली आहेत. 2011-12 मध्ये तिला सरदार पटेल आणि एकलव्य पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

रोनाल्डोची मॅनचेस्टर युनायटेडमध्ये घर वापसी, कराराची रक्कम ऐकून बसेल शॉक!

पॅरा टेबल टेनिसमध्ये एकूण 11 कॅटेगरी असतात. एक ते पाचपर्यंतच्या कॅटेगरीतले खेळाडू व्हीलचेअरवरून खेळतात. 6 ते 10 पर्यंतच्या कॅटेगरीतले खेळाडू उभे राहून खेळू शकतात. 11 क्रमांकाच्या कॅटेगरीतल्या खेळाडूंना मानसिक समस्या असते. भाविनाबेन पटेलने व्हीलचेअरवरून खेळून आतापर्यंतची वाटचाल केली आहे. 34 वर्षांच्या भाविनाचा सध्याच्या जागतिक क्रमवारीत 12वा क्रमांक लागतो. मनोरंजनासाठी व्हीलचेअरवरून टेबल टेनिस खेळायला सुरुवात करणाऱ्या भाविनाने एकदा जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांकही पटकावला होता. 2011 साली पीटीटी थायलंड टेबल टेनिस चँपियनशिप जिंकल्यानंतर तिने ही कामगिरी केली होती. ऑक्टोबर 2013 मध्ये बीजिंग आशियाई पॅरा टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये तिने महिलांच्या सिंगल क्लास 4 इव्हेंटमध्ये रौप्यपदक जिंकलं होतं. भाविनाने 2017 साली बीजिंग आशियाई पॅरा टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये कास्यपदक जिंकलं. भाविना क्लास फोरमधली खेळाडू आहे. या खेळाडूंच्या हातांना अपंगत्व नसतं.

IND vs ENG : भारतासाठी बॅटिंग करायला आला, पण पोलीस उचलून घेऊन गेले, VIDEO

क्वार्टर फायनल मॅचनंतर ती म्हणाली होती, ' सर्व भारतीयांच्या पाठिंब्यामुळेच मी ही मॅच जिंकू शकले. तुमच्या पाठबळावर मी सेमी-फायनल मॅचही जिंकीन.' तिने आपले शब्द खरे करून दाखवले आहेत.
First published: