मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

OMG! फायनलपूर्वी गायब होता नीरजचा भाला, पाकिस्तानच्या खेळाडूकडं सापडला

OMG! फायनलपूर्वी गायब होता नीरजचा भाला, पाकिस्तानच्या खेळाडूकडं सापडला

नीरज चोप्रा संतापला

नीरज चोप्रा संतापला

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यानं टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) गोल्ड मेडल पटकावून इतिहास रचला आहे. पण, ऑलिम्पिक फायनलपूर्वी नीरजचा भाला गायब झाला होता.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 25 ऑगस्ट: भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यानं टोकयो ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला आहे. त्यानं टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) गोल्ड मेडल पटकावून इतिहास रचला. ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक गोल्ड मेडल जिंकणारा नीराज हा दुसरा भारतीय आहे. यापूर्वी अभिनव बिंद्रानं (Abhinav Bindra) बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 2008 साली नेमबाजीमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. अ‍ॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक मेडल जिंकणारा नीरज हा पहिलाच भारतीय आहे.

नीरज चोप्राचा हा गोल्ड मेडलपर्यंतचा प्रवास तितका सहज झालेला नाही. अगदी फायनलपूर्वी नीरज प्रचंड टेन्शनमध्ये होता. याचं कारण म्हणजे आयुष्यातील त्याच्या सर्वात महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी त्याचा भाला गायब झाला होता. स्वत: नीरजनं 'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा अनुभव सांगितला आहे.

'मी फायनलपूर्वी माझा भाला शोधत होतो. तो मला सापडत नव्हता. त्यावेळी मी पाहिलं की अर्शद नदीम माझा भाला घेऊन फिरत आहे. ते पाहून मी त्याला सांगितलं की, 'भाई, हा माझा भाला आहे. तो मला दे. मला त्यानं थ्रो करायचा आहे. त्यानंतर त्यानं तो भाला मला दिला. या सर्व प्रकारामुळे माझ्या पहिल्या थ्रोवर परिणाम झाला. मी पहिला थ्रो घाईमध्ये फेकला होता.' असा अनुभव नीरजनं सांगितला आहे.

IND vs ENG: इंग्लंड टीममधील मतभेद उघड, जो रुटच्या 'त्या' निर्णयावर अँडरसन नाराज

अर्शद नदीम (Arshad Nadeem) हा पाकिस्तानचा भालाफेकपटू आहे. तो देखील टोकयो ऑलिम्पिकमध्ये फायनलसाठी पात्र झाला होता. ऑलिम्पिक फायनल खेळणारा तो पाकिस्तानचा पहिलाच भालाफेकपटू आहे. त्याला मेडल मिळवण्यात मात्र अपयश आले. तो फायनलमध्ये पाचव्या क्रमांकावर होता.

First published:

Tags: Olympics 2021