मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG: इंग्लंड टीममधील मतभेद उघड, जो रुटच्या 'त्या' निर्णयावर अँडरसन नाराज

IND vs ENG: इंग्लंड टीममधील मतभेद उघड, जो रुटच्या 'त्या' निर्णयावर अँडरसन नाराज

टीम इंडियानं लॉर्ड्स टेस्टमध्ये (India vs England) इंग्लंडचा 151 रननं पराभव केला होता. या पराभवानंतर इंग्लंडच्या टीममधील मतभेद उघड झाले आहेत.

टीम इंडियानं लॉर्ड्स टेस्टमध्ये (India vs England) इंग्लंडचा 151 रननं पराभव केला होता. या पराभवानंतर इंग्लंडच्या टीममधील मतभेद उघड झाले आहेत.

टीम इंडियानं लॉर्ड्स टेस्टमध्ये (India vs England) इंग्लंडचा 151 रननं पराभव केला होता. या पराभवानंतर इंग्लंडच्या टीममधील मतभेद उघड झाले आहेत.

  • Published by:  News18 Desk

हेंडिग्ले, 25 ऑगस्ट: टीम इंडियानं लॉर्ड्स टेस्टमध्ये (India vs England) इंग्लंडचा 151 रननं पराभव केला होता. या पराभवानंतर इंग्लंडचा कॅप्टन जो रूटच्या (Joe Root) निर्णयावर अनेकांनी टीका केली होती. रुटनं पाचव्या दिवशी घेतलेल्या निर्णयाचा इंग्लंडला फटका बसला, असा त्याच्यावर आरोप होत आहे. इंग्लंडचा अनुभवी फास्ट बॉलर जेम्स अँडरसननं (James Anderson) केलेल्या टीकेनंतर या आरोपांना नवं बळ मिळालं आहे.

लॉर्ड्स टेस्टमध्ये जो रुटच्या कॅप्टनसीमध्ये झालेली चूक अँडरसननं सांगितली आहे. एका पॉडकास्टला बोलताना अँडरसन म्हणाला की, ' जो रुटनं काही चुका केल्या. त्यानं बुमराह मैदानात उतरताच मार्क वूडला बॉलिंग दिली. माझ्यामते त्यावेळी तो जास्त भावनिक झाला होता. बुमराहला आऊट करण्याच्या ऐवजी त्याला धडा शिकवण्याचा त्याचा कदाचित उद्देश होता. तो मला बॉलिंग देऊ शकला असता. बुमराहनं आक्रमक बॅटींग केली असती तर वेगळा विचार केला असता, पण त्यानं थेट मला बदलून वूडला बॉलिंग दिली.' या शब्दात अँडरसननं त्याची नाराजी व्यक्त केली आहे.

इंग्लंड टीममध्ये होणार 2 बदल

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरी टेस्ट लीड्समध्ये होणार आहे. या टेस्टपूर्वी मार्क वूड (Mark Wood) जखमी झाल्यानं इंग्लंडला धक्का बसला आहे. वूडला लॉर्ड्स टेस्टच्या चौथ्या दिवशी दुखापत झाली होती. वूडच्या जागी साकिब महमूदचा समावेश होणार हे नक्की आहे.

IND vs ENG: विराट आणि रूटमध्ये मैदानाच्या बाहेरही झाला वाद, तिसऱ्या टेस्टपूर्वी धक्कादायक खुलासा

इंग्लंडनं बॅटींग ऑर्डर मजबूत करण्यासाठी टी20 क्रिकेटमधील नंबर 1 बॅट्समन डेव्हिड मलानचा तीन वर्षांनंतर टेस्ट टीममध्ये समावेश केला आहे. मलानचा हेडिंग्ले टेस्टमध्ये डॉम सिब्लेच्या जागी समावेश होऊ शकतो. तसं झालं तर हसीब अहमद आणि रोरी बर्न्स ही जोडी ओपनिंग करेल. पाच टेस्टच्या सीरिजमध्ये टीम इंडिया दोन टेस्टनंतर 1-0 नं आघाडीवर आहे. ही मालिका जिंकण्यासाठी इंग्लंडला हेंडिग्ले टेस्ट कोणत्याही परिस्थितीमध्ये गमावून चालणार नाही.

First published:

Tags: Cricket news, India vs england, James anderson, Joe root